निधन वार्ता : भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांना मातृशोक



भुसावळ : तेली समाज मंगल कार्यालयाजवळील रहिवासी सुशीलाबाई छबीलदास चौधरी (76) यांचे दीर्घ आजाराने सोमवार, 30 रोजी सकाळी निधन झाले. त्या भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी व प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातसूना, नातवंडे, पतवंडे असा परीवार आहे.