शहरात शांतता नांदो म्हणून धम्म भगिनी गृपची प्रार्थना.


भुसावळ – शहरात खूप काही घडामोडी घडत आहे , अनेक हिंसक घटना देखील घडल्या . शहरात शांतता नांदो म्हणून भुसावळातील उत्तर भागातील धम्म भगिनी गृप महिलांनी बौद्ध गया येथे सामुहिक प्रार्थना केली.

यावेळी डाॅ.मधु मानवतकर,वंदना सोनवणे,कविता निकम,रेखा पांडव,सुष्मिता कोल्हेकर,कल्पना तायडे,प्राजक्ता निकम,शिवानी पांडव,सिमा जोहरे,भारती सावळे,सरला मेढे,मनश्री रंगारी,कविता गजरे,रक्षा भालेराव,उषा सोनवणे यांच्यासह इतर महिला उपस्थित होते.