कम्फर्ट फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने व ललवाणी फाउंडेशनच्या सहकार्याने श्री. दे.ना भोळे महाविद्यालयाला पुस्तकांची भेट

भुसावळ – येथील नामांकित श्री देविदास नामदेव भोळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला कम्फर्ट फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने श्रीमती शेरील गायकवाड यांच्या संकल्पनेतून महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांची ,विविध प्रकारची , ज्ञानार्जन करण्यासाठी जवळपास 225 पुस्तकांचा संच भेट देण्यात आला .सदरील पुस्तक ललवाणी फाउंडेशन यांच्या सहकार्याने प्राचार्य डॉ.आर. पी. फालक यांना प्रा.डाँ.डि.एम ललवाणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .प्राचार्य डाँ. आर .पी . फालक यांनी आपल्या मनोगतातुन ही पुस्तके अमूल्य असून यामुळे विद्यार्थ्यांच्या वाचनाला व त्यांच्या प्रतिभेला व संशोधनाला वाव मिळणारी पुस्तके असून यामुळे ग्रंथालयात चांगल्या पुस्तकांची भर पडली आहे. खरोखरच हा सामाजीक उपक्रम शेरील गायकवाड यांनी कम्फर्ट फाउंडेशनच्या मार्फत चालविला असुन या फाउंडेशनच्या वतीने फक्त पुस्तकच नव्हे तर विविध गरजू विद्यार्थिनींना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गरिबांना मोफत वस्त्रे व इतर आवश्यक वस्तूंचा सुद्धा पुरवठा करण्यात येतो .त्याप्रमाणे कोरोना काळात या फाउंडेशनच्या वतीने गायकवाड यांनी अनेक स्तुत्य उपक्रम केले.शेरील गायकवाड सुध्दा शैक्षणीक
क्षेत्रात कार्यरत होत्या. त्याचप्रमाणे भुसाळातील ललवाणी फाउंडेशन ही संस्था सुद्धा प्रा.डाॅॅ. डी.एम. ललवाणी यांच्या संकल्पनेतून गेल्या तिन वर्षापासुन विवीध ऊपक्रम राबवीत आहे.मागील वर्षीच ललवाणी फौंडेशननेसुध्दा सुद्धा या महाविद्यालयाला पुस्तके भेट दिली होती असे नमुद केले.प्रा.डाॅ.डि.एम.
ललवाणी यांनी प्रतिपादन केले की,भोळे महाविद्यालयाने अल्पावधीतच चांगली प्रगती केली असुन निरनिराळे ऊपक्रम प्राचार्य फालक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले जात असतात व प्राध्यापक वर्ग सुध्दा अभ्यासु,मेहनती व शिक्षणाप्रती आवड असणारा आहे.महाविद्यालयाच्या स्थापनेपासुन मी या महाविद्यालयाच्या प्रगतीचा साक्षीदार आहे. महाविद्यालयाने व शेरील गायकवाड यांनी सेवा करण्याची संधी ऊपलब्ध करुन दिल्याबद्यल ललवाणी यांनी आभार व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी सुद्धा ही पुस्तके चाळल्यानंतर समाधान व्यक्त केले .याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. फालक ,ललवाणी फौडेशनचे अध्यक्ष प्रा.डाॅ.डि.एम.
ललवाणी, प्रा. आर डी भोळे, प्रा. डॉ.जे .बी. चव्हाण, प्रा. डॉ. आर.बी. ढाके, प्रा. एस.डी. चौधरी, प्रा. दीपक जायस्वाल, प्रा. डॉ.जे.पी.सरोदे, प्रा.एस .एस. धर्माधिकारी, प्रा. डॉ. ए.के. पाटील, प्रा. गायत्री नेमाडे नेमाडे आदी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते या स्तुत्य उपक्रमाचे शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक केले जात आहे.