भुसावळ – ऐन दसऱ्याच्या दिवशी रात्री १२ वाजेनंतर सुमारे एक वाजेच्या सुमारास शहरातील गरूड प्लॉट परिसरात दोस्ती मंडळाच्या जवळ महात्मा फुले नगर मधील रहिवासी
दिलीप जोनवाल यांच्यावर अज्ञात मारेकर्यांनी प्राणघातक हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
घटनेचे वृत्त कळताच त्वरित घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली .
-दरम्यान हा खून पूर्व वैमनस्यामधून झाला असावा अशी प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस प्रशासनाने तपास चक्रे फिरवली आहेत. तर मयत दिलीप जोनवाल हे माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस प्रशासनाने अनेक गुन्हेगारांना हद्दपार केले असले तरी देखील गुन्हेगारी कमी होत नसल्याचे दिसून येत आहे.यातच अलीकडच्या काळात खुनांची सुरू असलेली मालिका देखील कायम असल्याचे अधोरेखीत झाले आहे भुसावळ शहरासह परिसरातील गुन्हेगारी हा चिंतेचा विषय ठरत असून नागरिक भयभीत होत आहे .
. गेल्या महिन्यात भुसावळात चार खून झाले होते. यात अट्टल गुन्हेगार निखील राजपूत याच्यासह कंडारी येथील तिघांचा समावेश होता. यानंतर खडका रोड परिसरात एकाचा खून झाला होता. या पाठोपाठ आता शहरातील मध्यवर्ती परिसरात दिलीप जोनवाल ( वय ४९,) यांचा खून झाल्यामुळे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. रात्री उशीरापर्यंत या संदर्भात शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या कृत्याला पूर्व वैमनस्याची जोड असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस प्रशासनाने तपास चक्रे फिरवली आहेत. तर मयत दिलीप जोनवाल हे माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याची माहिती देखील समोर आली आहे.


