जळगाव – जळगाव शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडनगरी फाटा , कानळदा रोड ,श्री बडे जटाधारी महादेव मंदिराच्या मागे श्री शिवपुराण महाकथा आयोजित करण्यात आली आहे.

कथाकार पं. प्रदीप मिश्रा
कथा व्यास भागवत भूषण,आंतरराष्ट्रीय प्रवक्ता ,प्रवचनकार प.पू.प्रदीपजी मिश्रा ( सिहोरवाले ) हे विख्यात कथाकार असणार असून 5 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत होणार आहे.
श्री शिवपुराण महाकथा जागेचे विधिवत भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते कुदळ मारून व श्रीफळ फोडून झाले.यावेळी ” जय भोले बाबा की जय..” ‘ शिव शंकर शंभो ‘ ,हर हर महादेव ‘..असा जयघोष करण्यात आला.परिसरात भक्तिमय वातावरण दिसून आले.
याप्रसंगी व्यासपीठावर आमदार राजूमामा भोळे,माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर , जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, केशव स्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर ,हेमा अमळकर , भिकूबाई भरत चौधरी ,श्री शिवपुराण कथेचे संकल्पक जगदिश भरत चौधरी ,तुषार भरत चौधरी ( आव्हाणे ) आदी मान्यवर उपस्थित होते.
तर या कार्यक्रमास उपस्थितांमध्ये खासदार उन्मेष पाटील,भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे ,शिवसेना ( शिंदे गट ) महानगराध्यक्ष निलेश पाटील ,भाजपा आय.टी. सेलचे उत्तर महाराष्ट्र संयोजक गिरीश नारखेडे ,प्रसिध्द निवेदक,कलावंत तुषार वाघुळदे, शिवसेना ( उ.बा.टा. गट ) जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे आदी उपस्थित होते.
200 एकर जागेत ही श्री शिव पुराण महाकथा संपन्न होणार असून साधारणतः दोन ते तीन लाखाच्या वर भाविकांची उपस्थिती राहील अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे ,त्यासाठी युद्धपातळीवर अचूक नियोजन करण्यात येत आहे. सुसज्ज असा सभा मंडप लवकरच उभारण्याचे काम सुरू होणार आहे.
भाविक- भक्त मंडळी
भूमिपूजन सोहळा..
कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांना मध्य प्रदेशमध्ये प्रसिद्ध कथा वाचक व प्रसिद्ध भजनकार म्हणून ओळखलं जातं. ते सिहोर जिल्ह्यातील कुदेश्वर धाम येथील आहेत. मागील वर्षभरात पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांची ख्याती जगभर पसरली आहे.मालेगाव,नंदूरबार,अकोला,नागपूर यासह अनेक ठिकाणी त्यांच्या कथा झाल्या आहेत.त्यांना मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला आहे. कार्यक्रमास शेकडो महिला-पुरुष भाविक मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पाटील तर प्रास्ताविक व आभार प्रा.सतीश मोरे यांनी मानले.


