भुसावळ
येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय द्वारा विजयादशमीच्या निमित्ताने पाचवी माळ दिं 19/10/2023 गुरुवार पासून जामनेर रोड येथील साई जीवन सुपर शॉपी च्या समोर ओम प्लाझा मध्ये रोज सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत देवींचा सजीव देखावा दाखविण्यात आला आहे . हा देखावा दि 24/10/2023 पर्यंत दररोज सांयकाळी 7 ते 10 वाजे दाखविण्यात येणार आहे तरी नागरिकांनी या सजीव देवींचा देखावा पाहण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्राच्या मुख्य संचालिका सिंधू दीदी यानी केले हा चैतन्य देखावा साठी ब्रह्मकुमारी ज्योती बहन कविता बहन अनिल भाई नितीन भाई कुकरेजा भाई दिलीप भाई व नाना पाटील तसेच ओमशांती केंद्रातील अनेक भाई बहीण सहकार्य करत आहेत .



