कौशल्य आधारित शिक्षण हि बदलत्या काळाची गरज” – डॉ.एस.एम. गायकवाड यांचे प्रतिपादन : भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद

    भुसावळ - नवीन शैक्षणिक धोरणानुसार लागु होणाऱ्या विविध बदलत्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना कौशल्ये आधारित शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नसून त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने सजग राहून संशोधन वृत्ती जोपासणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भुसावळ येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात दि. १७ ऑक्टोबर २०२३ रोजी New Frontiers in Biological Sciences NFBS -2023 या विषयावर आयोजित  राष्ट्रीय परिषदेत बीजभाषण करतांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील प्रा. डॉ.एस.एम. गायकवाड यांनी केले.  
   तसेच वनस्पती आणि प्राणीशास्त्र विषयातील नोकरीच्या संधी, संशोधनाचे नवीन विषय यावर सखोल मार्गदर्शन केले.  या परिषदेत संपूर्ण भारतातून एकूण १२५ संशोधक, प्राध्यापक,विद्यार्थ्यानी सक्रिय सहभाग नोंदविला. यापैकी ५४ संशोधकांनी आपल्या शोधनिबंधाचे वाचन केले.     
     परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहनभाऊ फालक होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉ.एस.एम.गायकवाड,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर,  ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. महेशभाऊ फालक, सचिव श्री. विष्णूभाऊ चौधरी, कोषाध्यक्ष श्री. संजयकुमारजी नाहाटा, प्रा.डॉ.एम.बी.पाटील, चेअरमन वनस्पतीशास्त्र अभ्यासमंडळ, कबचौ उमवि जळगाव,  महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, अधिसभा सदस्य प्रा.ई.जी.नेहेते तसेच संयोजन समिती प्रमुख प्रा. डॉ.विद्या पाटील आणि प्रा. डॉ. मनोजकुमार जाधव यांची उपस्थिती होती. 

पोस्टर / पीपीटी प्रेझेन्टेशन निकाल :-
परिषदेत शोध निबंध स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सादरीकरणासाठी पोस्टर प्रथम- खुशबू तडवी, द्वितीय – शेख मेहविश मो.सलीम, प्रज्ञा साळुंखे तृतीय- शेख उझ्मा नाज शेख इकबाल तसेच पीपीटी प्रेझेन्टेशन सादरीकरणासाठी प्रथम-प्रा.डॉ.एस.वाय पाटील द्वितीय- प्रा.डॉ.आनंद जाधव तसेच तृतीय –प्रा.डॉ.एम.एस.पाटीलयांना पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.डॉ.एम.बी.पाटील, प्रा.डॉ.पी.आर.महाजन, प्रा.डॉ.एस.ए.पाटील, प्रा.डॉ.तन्वीर खान यांनी परीक्षण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे समन्वयक प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रा.ज्योती जंगले यांनी केले. प्रथम सत्राचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एम.जे.जाधव, तर द्वितीय सत्राचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ.सौ.विद्या पाटील यांनी केले.