दोंडाईचाला भरणार क्रिकेटचा महाकुंभ : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशभरातून ३२ राज्याचे संघ हस्ती चॅम्पियनशिप साठी झुंजणार ! फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली व्यवस्थेची पाहणी :

भुसावळ:- भारतीय टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशनच्या मान्यतेने महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट संघटनाच्या अधिपत्याखाली धुळे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटना येत्या नोव्हेंबर पहिल्या आठवड्यामध्ये दोंडाईचा येथे प्रथमच राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा चे आयोजन करणार आहे. स्पर्धेत देशभरातील ३२ मुले व २० मुलींचे संघ सहभाग घेणार आहेत. धुळे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष हस्ती पब्लिक स्कूलचे चेअरमन कैलास जैन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या आयोजन व्यवस्था पाहण्या करिता नुकतेच भारतीय टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशनचे चेअरमन व राज्य संघटनेचे सचिव डॉ. मोहम्मद बाबर व उत्तर महाराष्ट्राचे टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष यांनी वासेफ पटेल यांनी आयोजना संदर्भातल्या आयोजन कमिटी सोबत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

दोडांईचा येथे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निरीक्षणासाठी फेडरेशनच्या सदस्यांनी भेट दिली. स्पर्धेत ३५०पेक्षा जास्त मुलांच्या गटात खेळाडू व २५० मुलींच्या गटात खेळाडू स्पर्धेत भाग घेणार असून त्यांच्यासोबत त्या- त्या राज्य संघटनेचे पदाधिकारी ही दाखल होणार आहे. दोंडाईचाच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय स्तराच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत आहे. याकरिता हस्ती पब्लिक स्कूलच्या मैदानाची पाहणी, खेळाडूंची राहण्याची व्यवस्था, वाहतुकीसाठी व्यवस्था, वेलकम स्वागतासाठी चे नियोजन, भोजनाची व्यवस्था यासह इतर बाबींवर चर्चा करण्यात आली. प्रसंगी धुळे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव विशाल पवार यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होती सोमवारी दिवसभर याबाबत टीमने पाहणी केली.

राज्यातील क्रिकेट संघटनेतर्फे कैलास जैन यांचे सत्कार

दोंडाईचाला तालुका चे दर्जा सुद्धा प्राप्त नसून अशा ठिकाणी इतक्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजनाची जबाबदारी हस्ती पब्लिक स्कूलचे सर्वेसर्वा कैलास जैन यांनी स्वीकारली असून याकरिता संघटनेचे राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव डॉ.मो.बाबर यांनी कैलास जैन यांचे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले.