जवाहर नवोदय विद्यालय येथे वृक्षारोपण : जय गजानन मंडळ व साईलीला महिला बचत गटाचा उपक्रम

भुसावळ –

घरोघरी मंडळामधुन गणरायाचे आगमन झाले आहे त्यामुळे एक नवचैतन्य सर्वत्र पसरलेले आहे बाप्पासाठी भक्त विविध आरास करतात पाने फुलं ,कागद पुठ्ठे यांचा वापर सजावटीसाठी करतात . श्री गजाननाच्या पुजेसाठी हार दुर्वा यांचा वापर होते नंतर गणपती बाप्पांचे विसर्जनानंतर हे सर्व निर्माल्य विहिरीत नदीत फेकतात यामुळे प्रदुषण होते या बाबींचा विचार करून पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी अधिकाधिक प्रमाणात वृक्षांची लागवड व्हावी असा उद्देश समोर ठेवून हुडको कॉलनी येथील जय गजानन मंडळ व साई लीला महिला बचत गट यांच्याकडून जवाहर नवोदय विद्यालयात,साकेगाव येथे वृक्षारोपण केले

यात वड पिंपळ,चिंच बदाम ,अशोका अशी विविध झाडे लावली
यासाठी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य व्हि.एस्. अंभोरे यांनी सहकार्य केले वड पिंपळ ही वृक्ष निसर्ग पर्यावरण मंडळ यांनी उपलब्ध करून दिली यावेळी विद्यालयाचे इतर शिक्षक वृंद व कर्मचारी ही उपस्थित होते तसेच मंडळ व गटाचे प्रतिनिधी म्हणून बचत गटाचे अध्यक्षा सौ. जास्वंदी भंडारी,सूनिता राणे, मनीषा बर्हाटे, संध्या चौधरी ,हर्षल राणे,जयेश आंबेकर ,अनिल डोळे, आदित्य खडसे उपस्थित होते