.

.भुसावळ – आमदार व भारतीय जनता पार्टी,महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५सप्टेंबर रोजी राज्य शिक्षक आघाडीची कार्यकारिणी ची घोषणा केली असून प्रदेश संयोजक म्हणून प्रा डॉ प्रशम कोल्हे यांचेसह एक सह संयोजक, सात विभाग संयोजक आणि संपूर्ण महाराष्ट्रातून तेरा कार्यकारिणी सदस्य नियुक्त करण्यात आल्याची घोषणा एका पत्रकाद्वारे केली आहे सादर कार्यकारिणीत जळगाव,धुळे,नंदुरबार,नाशिक,अहमद नगर या पाच जिल्ह्यांच्या नाशिक विभागातून भुसावळ येथील शिक्षणतज्ज्ञ व गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांचे एक अभ्यासू,शिक्षकांचे अन्यायाविरोधात सातत्याने अग्र स्थानी असणारे शिक्षकांचे ज्येष्ट नेते म्हणून सुपरिचित असलेले शिक्षण तज्ज्ञ, प्र.ह. दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे दलाल यांच्या नियुक्तीचे अनेक शिक्षकांनी स्वागत व अभिनंदन केले आहे.


