भुसावळ प्रतिनीधी ,
भुसावळ येथील कनिष्ठ न्यायालयात २०१४ पासून अतिरिक्त सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू झाले आहे. यासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. या इमारतीमधील फर्निचरसाठी राज्य शासनाने ५ कोटी १४ लाख ३२ हजाराचा निधी मंजूर केल्याची माहिती वकील संघाचे अध्यक्ष तुषार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अॅड. पाटील म्हणाले की, अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यासाठी ११ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला होता. त्या निधीमधून अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या दोन मजली इमारती बांधल्या गेल्या. या वास्तूमधील फर्निचरसाठी राज्य सरकारने ५ कोटी १४ लाख ३२ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. लवकरच फर्निचरचे काम पूर्ण होऊन दोन्ही मजले अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या कामकाजासाठी वापरले जातील. वकील संघाचे धनराज मगर, राजेश कोबीड, पुरुषोत्तम पाटील, जास्वंदी भंडारी, विश्वंभर वाणी उपस्थित होते.


