भुसावळात जालन्यातील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाचे लाक्षणिक उपोषण :

भुसावळ – येथील शहर पोलिस स्टेशनजवळ तालुका मराठा समाजातर्फे जालन्यातील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी विविध पक्ष, सामाजिक संघटनांतर्फे पाठिंबा देण्यात आला. यावेळी आ. संजय सावकारे, आ. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत समाजातील पदाधिकार्‍यांनी पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांना निवेदन दिले.
भुसावळ तालुका मराठा समाजातर्फे मनोज जरांगे पाटील जालना यांनी सुरू केलेल्या उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात आला असून त्या ठिकाणी झालेल्या अमनुष लाठी चार्जबद्दल प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. मराठा समाज आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांना त्वरित आरक्षण देऊन उपकृत करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. भुसावळ मराठा समाजाच्यावतीने प्रशासनाकडे मागण्या करण्याबरोबर जालना येथे निरपराध समाज बांधवांवर झालेल्या खोटे गुन्हे रद्द करण्यात यावे, गृहमंत्र्यांनी घटनेची जबादारी स्वीकारून जाहीर माफी मागावी, त्याचबरोबर सर्व मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. ५ सप्टे. रोजी भुसावळ तालुका मराठा समाजातर्फे करण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषणाला भाजपाचे आ.संजय सावकारे, आ.चंद्रकांत पाटील यांनी जाहीर पाठींबा दिला. यावेळी भुसावळ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे समाधान महाजन, अ‍ॅड. वैâलास लोखंडे, दीपक धांडे, निलेश महाजन, आदींचा जाहीर पाठिंबा, लोणारी समाजाच्या वतीने माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी जाहीर पाठिंबा दिला. आरपीआय आठवले गटातर्फे जिल्हाध्यक्ष राजु सूर्यवंशी व पीआरपी कवाडे गटातर्फे जगन सोनवणे, राकेश बग्गन यांनी दहा संघटनांच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला. वंचित बहुजन आघाडी भुसावळतर्फे विनोद सोनवणे यांनी तर बामसेफ संघटना भुसावळ यांनी जाहीर पाठिंबा दिला. मुस्लिम समाजाचे रहमान शेख, राजेश्री संघमित्र महिला बहुउद्देशीय फाऊंडेशनच्या राजेश्री सुरवाडे, भुसावळ काँग्रेस तालुकाध्यक्ष यांच्यासह इतर संघटना व पक्षांकडून मराठा समाजाच्या उपोषणाला जाहीर पाठींबा देण्यात आला. आंदोलनप्रसंगी मराठा समाज अध्यक्ष रवींद्र ढगे, उपाध्यक्ष पंकज हिंगणे, सल्लागार माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, सहसल्लागार अ‍ॅड. पी. पी.मोझे, सचिव रवींद्र लेकुरवाळे, सहसचिव रजत शिंदे, कोषाध्यक्ष शैलेंद्र ठाकरे, खजिनदार हितेश टकले, सहखजिनदार महेंद्र पाटील, अ‍ॅड. जास्वंदी भंडारी, अ‍ॅड. सुनील बर्गे, कृष्णा शिदे, रुख्मिणी साळुंखे, दत्ता साळुंखे, मुकेश गुंजाळ, ललित मराठे, अ‍ॅड. तुषार पाटील, राजेंद्र पाटील, सतिष ओगले, राजेंद्र पाटील, नरेश पाटील, सारंगधर पाटील, नानू ओगले, प्रदिप देशमुख, पिंटु मराठे, राजेंद्र बावडेकर, संजय शिंदे, गजानन पवार, ज्ञानेश्वर जगदाळे, किरण पाटील, राहुल बोरसे, कृष्णा शिंदे, संजय कदम, ईश्वर पवार राजेंद्र चौधरी, आनंद ठाकरे, दिपक मराठे, दीपनगर युनीयन अध्यक्ष भरत पाटील,ðअ‍ॅड. हरिष पाटील, समाधान पवार, शिवाजी पाटील, रविंद्र पाटील, गिरीश पवार, अभिजित मराठे, मयूर पाटील, भूषण भदाणे, रवींद्र पाटील, वासुदेव सोनवणे, अमोल दांदळे, ऋषिकेश ठाकरे, महेंद्र ठाकरे, प्रशांत पाटील, विजय पाटील, रुपेश देशमुख, स्वप्निल इंगळे, किरण हिसेकर, मनिष सारंगपाटील, विशाल चौधरी, लक्ष्मण मोरे, आदी उपस्थित होते. हे आंदोलन मराठा समाज उपाध्यक्ष व सर्व मराठा समाज पदाधिकारी, जेष्ठ समाजसेवकांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी समस्त मराठा समाज बांधव भुसावळ शहर, तालुका पदाधिकारी उपस्थित होते.