शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी दिलेल्या गौण खनिजच्या बिलांची चौकशी व्हावी – दिपक धांडे : कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार – इशारा

.


भुसावळ – शहरातील पालिका हददीत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी दिलेल्या गौण खनिज ( मुरूम ) याचा वापर करून बिले काढण्यात भ्रष्टाचार होत असून सदर कामाची चौकशी करण्यात यावी व चौकशी समिती नेमून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख दिपक काशिनाथ धांडे यांनी केली असून याबाबत भुसावळ नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे . शासकीय नियमानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे .
,
निवेदनात नमूद आहे की , नगर पालिका प्रशासनाच्या वतीने भुसावळ शहरातील खड्डे बुजवण्यात आले ,त्या साठी टेंड्डर देण्यात आलेले असून त्या कामात खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आढळून येत आहे,म्हणून सदर कामाची चौकशी करण्यात यावी व चौकशी समिती नेमून कार्यवाही करण्यात यावी जो पर्यंत या कामाची चौकशी आमच्या समक्ष स्पॉट पंचनामे नुसार करण्यात येत नाही तो पर्यंत या कामाचे कोणतेही बिले देय करण्यात येऊ नये.
स्पॉट पंचनामे हे समक्ष व सक्षम अधिकारी हे मुरूम टाकलेल्या स्थळावर जाऊन प्रत्येकी ब्रास प्रमाणे जो मुरूम टाकण्यात आलेला आहे व जो बिलावर नमूद करून बिले काढण्यात येत आहे त्यानुसार असावे कारण या कामात व बिलात खूप मोठी तफावत असल्याचे आपल्या सक्षम अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी यांच्या लक्षात आणून देण्यासाठी हा अर्ज देण्यात आला आहे
सदरच्या अर्जावर त्वरित शासकीय नियमानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) गट यांच्या तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन किंवा मोर्चे काढण्यात येतील अर्जावर त्वरित कार्यवाही उचित कालावधी मध्ये न झाल्यास या भ्रष्टाचार बाबत संबंधित अधिकारी,कर्मचारी यांना पूर्व कल्पना होती असे समजण्यात येईल अर्जाचा गांभीर्याने विचार करण्यात यावा व तत्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सुद्धा
दिपक धांडे यांनी केली आहे .