भुसावळ नाहाटा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना आयोजित “वर्कशॉप ऑन करियर इन सीए चे आयोजन”

भुसावळ – शहर आणि परिसरातील सीए होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की आपल्या महाविद्यालयात द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया दिल्ली (आयसीएआय) आयोजित “वर्कशॉप ऑन करिअर इन सीए”चे आयोजन दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी10.30 वा. नाहाटा महाविद्यालयातील वाचनकक्षात केलेले आहे.यात .मुकेश अग्रवाल(सीए भुसावळ) आणि विनोद जाधव (आय सी ए आय प्रतिनिधी, दिल्ली)यांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन होणार आहे,सीए होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयोगाची असल्याने उज्वल भविष्य घडवण्याची इच्छा असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन नाहाटा महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेतर्फे करण्यात येत आहे