नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे जिल्हा कारागृहात रक्षाबंधन साजरे :

जळगाव – आज रक्षाबंधन निमित्त जिल्हा कारागृह जळगाव येथे न्यायबंदी बांधवांना नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आली.

न्यायबंदी हे वेगवेगळ्या ठिकाणचे असून छोट्या मोठ्या गुन्ह्याबद्दल जिल्हा कारागृहात बंदी असून ते आपल्या घरापासून दुर आहेत.त्यांना आपल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असताना घरापासून दुर असून अशा सामाजिक उपक्रमाने त्यांचें मनपरिवर्तन होण्यास मोठे सहकार्य होईल हे जाणून अध्यक्षा सौ मनिषा पाटील यांच्यासोबत संस्थेच्या सचिव श्रीमती ज्योती राणे व कार्याध्यक्ष नूतन तासखेडकर यांनी न्यायबंदी बांधवांना राख्या बांधल्या.या प्रसंगी अहोरात्र कर्तव्यावर असणारे अधीक्षक वाढेकर , तुरुंगाधिकारी कंवर , अनिल पाटील, गजानन पाटील, जेल सुभेदार ,नेवाडे हवालदार इत्यादी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना देखील राखी बांधण्यात आल्या .