जळगाव – अहोरात्र कष्ट करून समाजासाठी धडपड करीत असतात. आपल्या जगण्याचे ओझे ते वाहत असतात ते म्हणजे हमाल बांधव. सण समारंभ असले तरी ते आपले कर्तव्य करण्यात तत्पर असतात. रक्षाबंधन सारख्या सणाला देखील ते आपली सेवा कष्ट करून बजावतात.अशावेळी आपले बहिणींचे देखील कर्तव्य आहे की आपल्या संपुर्ण कुटुंबासाठी धडपड करणाऱ्या या भावाला राखी बांधणे. त्या निमित्ताने दिनांक३० /०८/२०२२ रोजी सकाळी ठीक 10 वाजता दाणा बाजार जळगाव येथे नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे हमाल बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी करण्यात आली. सर्वात प्रथम संस्थेच्या अध्यक्षा सौ मनिषा पाटील यांनी हमाल बांधवांशी हितगुज केलें
या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ मनिषा पाटील यांनी रस्त्यावरील दिव्यांग बांधवांना व हमाल बांधव यांना औक्षण करून राखी बांधून सुरुवात केली. या नंतर श्रीमती ज्योती राणे, सौ नूतन तासखेडकर, किमया पाटील, हर्षा गुजराथी, निता विसावे, विजया पांडे यांनी उपस्थित राहून हमाल बांधवांना राख्या बांधण्यात आल्या व शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी हमाल कामगार सेना दाणा बाजार अध्यक्ष शेषराव वलकर, सचिव सुभाष काळभोर, संजय कदम, सुरेश गायकवाड, इत्यादी हमाल बंधू उपस्थित होते



