दुरांतो एक्सप्रेस मध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या आरपीएफ कर्मचाऱ्याने सी टी आयला केली मारहाण! –

भुसावळ प्रतिनिधी – मुंबई वरून प्रयागराज कडे जाणान्या दुरांतो एक्सप्रेस मध्ये विना तिकीट प्रवास करणारे रेल्वे सुरक्षा बल (आर पी एफ ) विभागाचे कर्मचारी एस पी शुक्ला हे सह पत्नी मुंबई ते सतना प्रवास करीत होते मुंबई स्टॉपचे सी टी आय मनोज सिन्हा यानी यात्रीस तिकीट विचारले असता त्यांच्या जवळ कुठलाही यास तसेच तिकीट नव्हते यांचा राग आल्याने एस पी शुक्ला यांनी सी टी आय मनोज सिन्हा यांच्या सोबत अरेरारी भाषेत बोलून इगतपुरी दरम्यान सायंकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान दुरांतो एक्सप्रेस मध्ये राडा करीत मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक २६/८/२०२३ रोजी ट्रेन नंबर १२२९३ दुरांतो एक्सप्रेस ही मुंबई वरून प्रयागराज कडे जात असताना ए.सी. कोच सेकंड मध्ये सी. टी. आय. मनोज सिन्हा हे तिकीट तपासणी करीत असताना दुरांतो एक्सप्रेस बिना तिकीट प्रवास करणारे रेल्वे सुरक्षा बल विभागाचे एस पी शुक्ला राहणार सतना हे सह पत्नी प्रवास करीत असताना त्यांना राग आल्याने सी. टी. आय. मनोज सिन्हा पास सायकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान मारहाण केली व जीवेठार मारण्याची धमकी दिली. “रेल्वे सुरक्षा बल विभागाचे एस पी शुक्ला सी. टी. आय. मनोज सिन्हा यांना म्हणाले की, जर माझ्याकडे बंदूक असती तर जागेच गोळी मारली असती” अशी धमकीही दिली. तसेच एस कोच सेकंड मध्ये ट्रेन कोच वेटर जेवण घेऊन जात असतांना त्यास सी. टी. आय. मनोज सिन्हा यास रेल्वे सुरक्षा बल विभागाचे एस पी शुक्ला हा मारहाण करीत होता याचे भांडण सोडवण्यासाठी गेलेले रामदयाल तिवारी यांना सुद्धा एस पी शुक्ला यांनी मारहाण केली.सदरील घटना ही इगतपुरी दरम्यान पडली दुरंतो एक्सप्रेस हा मुंबई वरून भुसावळला धावत असल्याने सदरील घटने बाबल सिनियर डी. सी. एम तसेच कंटोल व रेल्वे सुरक्षा बल विभागाला माहिती कळविली दुरंतो एक्सप्रेस ही भुसावळ फलाटांवर पोहचताच आय. आर. टी. सी. एस ओ युनियन व चेकिंग स्टॉफ असे २०० कर्मचारी यांनी पट निषेध करीत घोषणाबाजी केली.

यादरम्यान रेल्वे सुरक्षा बल विभागाचे अधिकारी व कर्मचान्यांनी संशयित आरोपी एस पी शुक्ला व त्यांच्या पत्नीस वाचवण्याचा प्रयत्न केला तसेच दबाब ही आणला मात्र कुठल्या दबावाला बळी न पडता आय. आर. टी सी. एस. ओ. युनियनच्या पदाधिकाऱ्यानी सी. टी. आय. मनोज सिन्हा यांना लोहमार्ग पोलीस स्टेशन भुसावळ नेले व झालेल्या घटनेसंदर्भात माहिती दिल्यावरून (दिनांक २७) रोजी रात्री बारा वाजेच्या दरम्यान लोहमार्ग पोलीस स्टेशन भुसावळला आर.पी. एफ. विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे