चाळीसगाव पोलिसांना वॉण्टेड भुसावळातील संशयित आरोपी एलसीबीच्या जाळ्यात –

जळगाव : चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील भुसावळातील पसार संशयिताला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने भुसावळातून अटक केली. शेख शाकिब शेख दाऊद (21, रा.जाम मोहल्ला, भुसावळ) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित शेख शाखेत हा भुसावळ शहरात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळताच त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. हवालदार लक्ष्मण पाटील, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, महेश सोमवंशी यांच्या पथकाने सोमवारी संशयित शेख शाकीब याला भुसावळ शहरातून अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.