जळगाव निवासी हिंगोणेकर मित्र मंडळाची वार्षिक सभा संपन्न

जळगाव – जळगाव हिंगोणेकर मित्रमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी साईलीला लॉन्स या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष गोपाळ लालू भोळे तसेच मंडळाचे पदाधिकारी, सभासद आणि कुटुंबीय यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रा. ए बी पाटील यांनी मार्गदर्शन केले. सभेमध्ये १०वी / १२ वी / इंजीनियरिंग, मेडिकल आणि इतर क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला .संजय दिनेश भोळे यांनी सभेसाठी आणि जेवणासाठी केलेली व्यवस्था उत्कृष्ट होती. विद्यार्थ्यांना द्यावयाच्या ट्रॉफीज प्रा. प्रमोद भास्कर लोंढे यांनी स्वखर्चाने दिल्या. अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या शेवटी आभार प्रदर्शन झाले