भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील तृतीयपंथी ज्योती व खुशी यांनी सुद्धा महाशिवरात्री निमित्त येथील रेल्वे पुलाच्या वरील रेल्वे लाईनला लागून असलेल्या भागातील शिवमंदिरात शिवपूजन करीत शिवाची आराधना करून मनोभावे पूजन करून महाशिवरात्री उत्साहात व आनंदाने साजरी केली .
रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी तथा पंधरा बंगला भागातील रहिवाशी शिवभक्त सुनील सूर्यवंशी यांनी कर्तव्यावर असतांना स्व:खर्चाने या शिवलिंगाची स्थापना करून मंदिर बांधले होते .
महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर
शिवलिंगास दुग्धाभिषेक करून विधिवत पूजन करण्यात आले. तदनंतर महाआरती करण्यात आली. शिवभक्तांना प्रसाद म्हणून साबुदाण्याची खिचडी वाटप करण्यात आली.यावेळी ज्योती व खुशी या तृतीयपंथी बांधवासह परिसरातील नागरिकांनी शिवलिंगाचे मनोभावे पूजन करून महादेवाकडे सर्वांचे कल्याण व्हावे अशी इच्छा वक्त करीत शिवास साकडे घातले .देव सर्वांकरिता सारखाच असल्याने देवाची द्वारे सर्वांकरिता खुले असल्याचा संदेश या तृतीयपंथी बांधवानी यावेळी दिला .



