बायको माहेरी जाण्याचा राग : सख्या मुलाने जाळले आई- वडीलांचे घर

मुक्ताईनगर :- तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे एक विचित्र घटना घडली असून बायको माहेरी गेल्यानंतर, आपल्या आई-वडिलांनीच याला फुस दिल्याच्या संशयातून सख्या मुलाने त्यांचे घर जाळून टाकले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावातील हे घटना आहे. यात संशयित आरोपी समाधान भीमराव घोडकी याची बायको अलीकडेच माहेरी गेली होती. आपले वडील व आई त्यांच्यामुळेच बायको माहेरी गेल्याचा संशय त्याच्या मनात बळावल. यावरून त्याने आई-वडिलांना धमकाविले देखील होते. यानंतर बापावरती संशय घेत दगड घेऊन तुम्हाला मारतो असे धमकावत त्यांनी सर्व घरातील वस्तू जाळून टाकले. यात किमान 8000 रुपये किमतीचे संसार उपयोगी कपडे, धान्य, गादी, पलंग व घरातील इतर साहित्य जळून खाक झाले. यासंदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला समाधान घोडकी याची आई सौ. सुरजाबाई भिमराव घोडकी यांच्या फिर्यादीवरून त्याच्या विरोधात भा दं वि कलम 436, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार संजीव पाटील करत आहे.