भुसावळ – महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभाग ,व राजीव गांधी वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २०ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली .स्थानिक राजीव गांधी वाचनालय नसरवांजी फाईल येथे आयोजित कार्यक्रमात माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांच्या प्रतीमेला प्रदेश उपाध्यक्ष व राजीव गांधी वाचनालय चे संस्थापक अध्यक्ष मो मुनव्वर खान व जिला सचिव सुबीया फरहत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलेया प्रसंगी शहर अध्यक्ष सलीम गवळी, सेवादल शहर अध्यक्ष संजय खडसे, जिला सचिव हमीद शेख जिल्हा उपाध्यक्ष जे बी कोटेचा, महीला उपाध्यक्ष हमीदा गवली, यास्मीन कुरैशी महीला शहर अध्यक्ष यास्मीन शेख यांनी पण विनम्र अभिवादन केले या प्रसंगी फातेमा तडवी जानी गवली,शिला परदेशी,बेबी ईदा,व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .



