भुसावळ – येथे सोनिच्छा वाडी मध्ये दि १९ ऑगस्ट हा जागतिक छायाचित्र दिन म्हणून साजरा केला जातो. शहरातील सिनियर फोटोग्राफरां तर्फे कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
या वेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडण्यात आले.प्रसंगी सत्कारमुर्ती व कार्यक्रमाचे अध्यक्ष नरसिंग राठोड,विकास वाणी,विवेक वणीकर,विलास साळी यांनी द्वीप प्रज्वलन करुण कार्यक्रमाची सुरवात केली. त्यानंतर कॅमेरा पुजन करण्यात आले. शहरातील सर्वात जुने फोटोग्राफर ज्यांनी फोटोग्राफीचा वारसा अजूनही टीकवून ठेवला आहे असे विकास वाणी, विवेक वणिकर, विलास साळी या ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष भुसावळ सिनियर फोटोग्राफर गृपचे नरसिंग राठोड होते, फोटोग्राफी,कृष्णधवल काळावर काव्य गमती जमती,अनुभव सुख दुःख प्रसंग अश्या विविधतेने कार्यक्रम संपन्न झाला.अविनाश साळी,गोकूळ महाजन,श्याम गोविंदा,गणेश राठोड,भरत शिंपी,मुकेश नेवे यांनी सहकार्य केले. सिद्धेश राठोड,पुष्कर शिंपी यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र जावळे यांनी तर आभार गोकुळ महाजन यांनी मानले.



