भुसावळ – येथे एका बेवारस मनोरुग्ण तरुणी ला सुखरुप आश्रम मध्ये गोसेवक बांधव रोहित महाले व सहकारी यांनी
पाठवून माणुसकीचे दर्शन घडविले .
दि.12/08/2023 रोजी भुसावळ मधील सातारा वार्ड मध्ये व्यंकटेश कॉम्प्ले्स परिसरात गेल्या दोन दिवसापासून एक 22 वर्षीय तरुणी फिरत होती व ती मनोरुग्ण आहे अशी माहिती पाटील इलेक्ट्रॉनिक दुकान कडून गोसेवक रोहित महाले यांना कॉल वरून कळवण्यात आली. नंतर उमाकांत महाजन यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये पो.अनिल मोरे संपूर्ण विषय सांगून त्यांची परवानगी घेतली. परवानगी मिळल्या नंतर विरेंद्र तुरकेले
तुषार धोसेले , रोहन सपकाळे
दिवेष अडगले
यांनी रुग्णवाहिकेत त्या मनोरुग्ण मुलीला आणि स्टार लॉन येथून एका 54 वर्षीय बेवारस मनोरुग्ण बाबांना सुखरुप मानव सेवा तीर्थ .चोपडा येथे सोडण्यात आले व ॲंबुलन्स चा खर्च पिंटू मराठे व पिंटू कोठारी यांनी दिला.
रुग्णाच्या म्हणण्या प्रमाणे मुलगी ही उत्तर प्रदेश व बाबा हे नेपाळ येथील रहिवाशी आहे. पुढे त्यांचे गावं व नातेवाईक यांचा शोध सुरू आहे.



