भुसावळातील सामाजिक कार्यकर्त्या दीपाली वाणी-बर्‍हाटे यांचा पुढाकार : प्रभाग क्रमांक 24 मध्ये पथदिव्यांचा झगमगाट : नागरिकांमध्ये समाधान :

भुसावळ : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या प्रभाग क्रमांक 24 मधील समाजसेविका दीपाली वाणी (बर्‍हाटे) व विजय बर्‍हाटे यांच्या सौजन्यातून शहरातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये झगमगाट झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात पथदिवे बंद असल्याने आबालवृद्धांची मोठी गैरसोय होत होती. या संदर्भात दीपाली वाणी-बर्‍हाटे यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर त्यांनी त्यांनी 70 वॅटचे एलईडी दिवे प्रभागात स्वखर्चाने बसवले आहेत. एलईडी दिवे बसवण्यात आल्यानंतर पथदिव्यांनी हा प्रभाग उजळल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रभाग क्रमांक 24 मधील दिगंबर नगर, स्वामी समर्थ कॉलनी, निर्मल ऑईल मिल, केसर नगर, रामानंद कॉलनी, महेश नगर या भागात एलईडी लाईट बसवण्यात आल्याने पादचार्‍यांसह आबालवृद्ध व वाहनधारकांची मोठी सोय झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या दीपाली वाणी-बर्‍हाटे यांनी प्रभागातील नागरीकांची समस्या सोडवल्याने नागरीक त्यांना धन्यवाद देत आहेत.