पाचोरा येथील पत्रकारास झालेल्या मारहाणीचा निषेध :शहर पत्रकार संस्थेतर्फे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन


भुसावळ – पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना भर चौकात जबर मारहाण घटनेचा व स्थानिक आमदार यांच्याकडून शिविगाळ करीत मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे संस्था अध्यक्ष प्रेम परदेशी,यांच्या नेतृत्वात
जाहिर निषेध करून मारहाण करणार्‍यांवर क ड क कारवाई करण्यात यावी याकरीता भुसावळ उपविभागीय कार्यालयातील प्रांदाधिकारी जितेंद्र पाटील यांना भुसावळमधील पत्रकारांतर्फे निवेदन देण्यात आले आहे.
जळगांव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदिप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकत्यांनी मारहार व शिवीगाळ केली. पत्रकारांवर केलेल्या हल्ल्याचा कदापि समर्थन करता येणार नाही. पत्रकार संदिप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे निषेध करण्यात आला आहे. याप्रकरणी गंभीर दखल घेऊन आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. दोषींना कडक शासन करण्यात यावे पत्रकार संदिप महाजन यांना न्याय मिळून देण्याबाबत पुर्ण सहकार्य करावे ही मागणी करण्यात आली आहे.. लोकप्रतिनिधींनी संयम बाळगून आपले कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधींनी शिवीगाळ किंवा अपमानजनक वक्तव्य करु नये अशी समज आमदार किशोर पाटील यांना आपल्या स्तरावरुन देण्यात यावी. भुसावळ शहर पत्रकार संस्थेमार्फत प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहे.
यावेळी भुसावळ शहर पत्रकार संस्था अध्यक्ष प्रेम परदेशी, शहर पत्रकार संस्था सचिव हबीब चव्हाण,व्हाईस ऑफ मीडिया तालुकाध्यक्ष उज्वला बागुल, व्हाईस ऑफ मिडीया तालुका सचिव सुनील आराख, संतोष शेलोडे, निलेश फिरके, अभिजीत आढाव, वसंत कोलते, राजू चौधरी, कलीम पायलेट, सलाउद्दीन आदिब, संजय काशीव, कमलेश चौधरी, विनोद गोरधे, सद्दाम खाटीक, सतीश कांबळे, गोपी म्याद्रे, राहुल वानखेडे, सुरेश महाले, निलेश वाणी, आकाश ढाके, रवींद्र कोलते, राजेश तायडे, कालू शहा, वैâलास उपाध्यय आदी उपस्थित होते.