भुसावळ – येथील अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल तसेच अवनी बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद लाभला .

येथील पंचायत समिती कार्यालय हॉल मध्ये
रविवार रोजी दोन सत्रात झालेल्या प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिरात जवळपास अडीचशे लोकांनी सहभाग नोंदवला यावेळी यावेळी डॉ.मधु मानवतकर, स्त्री रोग तज्ञ डॉ. सुवर्णा गाडेकर डॉ. शंतनू साहू ,डॉ स्वप्नजा वानखेडे, डॉ.धनश्री बडगुजर,जिल्हा आपत्कालीन विभाग प्रमुख नरवीर सिंग रावळ,,
दीपक नाटेकर अलेक्झांडर प्रेसडी ,लताताई तायडे अरुण तायडे ,रजनी बडगुजर यांनी दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन केले,
यावेळी सर्वप्रथम डॉ वंदना वाकचौरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून कार्यक्रमाची सुरुवात केली,
यावेळी प्रथम सत्रा मध्ये डॉ शंतनू साहू यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना आपत्कालीन परिस्थितीमध्ये CPR कसे द्यावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले व योग्य पद्धतीने सीपीआर समजावून सांगितले
त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉ. स्वप्नजा वानखेडे यांनी
First Aid म्हणजे काय हे सांगून
First Aid Box कसा तयार करतात आणि फर्स्ट एड चे महत्व ही समजून पटवून दिले ,
यानंतर द्वितीय सत्रामध्ये
डॉ. राजेश मानवतकर यांनी कोणतेही यशस्वी डॉक्टर पॅरामेडिकल स्टाफ शिवाय अपूर्णच आहे हे सांगून विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील पॅरामेडिकलचे महत्व पटवून दिले ,
या नंतर न्हावी येथील गरिमा सेंटरच्या विद्यार्थिनींनी अंधश्रद्धा आणि बुवाबाजी या एकांकिकेच्या माध्यमातून अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन सर्पदंश झाल्यास कशा पद्धतीने एखाद्याचा बळी जाऊ शकतो हा सकारात्मक संदेश देऊन उपस्थितांची मने जिंकून घेतली,
तदनंतर
अवनी बहुउद्देशीय संस्थेचे मार्गदर्शक व वरिष्ठ सर्पमित्र अलेक्झांडर प्रेसडी ,
अमित ,अली ,सतीश कांबळे, कल्पेश तायडे, धीरज शेखकोरे,
रोहित श्रीवास्तव ,रवी तायडे, दीपक वाघ, गजेंद्र तायडे, प्रमोद गायकवाड ,संतोष राजभर, योगेश भाईसे ,या सर्पमित्रांच्या टीमने प्रशिक्षणार्थींना वेगवेगळ्या पद्धतीच्या विषारी ,बिनविषारी सापांची ओळख करून देऊन त्यांना सर्पदंश झाल्यास कशा पद्धतीने त्यावर उपाययोजना करता येतील हे खूपच विश्लेषकपणे समजून सांगितले,
मग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नरवीर सिंह रावळ यांनी
उपस्थित प्रशिक्षणार्थींना आपत्ती व्यवस्थापन कसे करावे यावर सविस्तर मार्गदर्शन केले,
त्याच पद्धतीने त्यांनी अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या दहा विद्यार्थ्यांची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील काही शाळांना प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करण्यासाठी निवड केली,
शेवटी सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप केले गेले,
या प्रशिक्षण शिबिराचे संपूर्ण दिवसाचे सूत्रसंचालन समाधान जाधव सरांनी सूत्रबद्ध पद्धतीने केले
शेवटी अध्ययन पॅरामेडिकलच्या प्राचार्या रजनी बडगुजर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी प्रजावती तायडे ,कविता जाधव ,मंजू रील ,रेणुका उईके, तौसिफ शेख ,ऐश्वर्या सुरवाडे, विनीत दवंगे, सायली साबळे, नकुल ठोसर ,प्रियंका भालेराव, रीना पारदे यांनी केले


