भुसावळात तहसील कार्यालयावर सकल मराठा समाजातर्फे मोर्चा :


भुसावळ – भडगाव तालुक्यातील गोडगाव येथील चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या निषेधार्थ संशयीताला फासावर लटकवा, अशी मागणी करीत निषेधाचे निवेदन सकल मराठा समाजातर्फे तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध नोदविण्यात आला.

सकल मराठा समाजातर्फे तहसीलदार निता लबडे यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला, पुरूष यांनी तहसील कार्यालयात गर्दी केली होती. याप्रकरणातील संशयीत स्वप्निल पाटील याला अटक केली असून याला फासीची शिक्षा द्यावी, जेणे करून पुन्हा कोणी मुली आया बहिणींकडे वाईट नजरेने पाहणार नाही. या प्रकरणात त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी सुध्दा सहकार्य केल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे. हा खटला अतिजलद न्यायालयात चालवावा आरि यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम ाांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. याप्रकरणातील संशयीत याला फाशी झाली नाही तर समाजातर्फे आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा। सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला आहे. निवेदनावर राजेंद्र आवटे , अँड तुषार पाटील , भानुदास पाटील, अंबादास मराठे, विलास पाटील, प्रमोद पाटील, उज्वला पाटील, प्रतिभा मराठे, रूपाली पाटील, अंजनाबाई पाटील, भारती पाटील, शोभा महाजन, माधुरी पाटील, शितल मराठे आदी महिला, पुरूष निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयात उपस्थित होते. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवला होता.