लीनेस क्लबचा अनोखा उपक्रम ; महिला पोलीसांना मैत्रीबंध बांधून केल्या मैत्रीणी :

भुसावळ – सदैव आपल्या सर्वांसाठी रात्रंदिवस कार्यरत असलेल्या महीला पोलिसांना सुद्धा दैनंदिन जिवनात आपल्या मैत्रिणी पासून दुरावा मिळू नये त्यांच्याही मैत्रिणी असाव्या याहेतूने प्रेरित होऊन येथील लीनेस क्लबच्यावतीने
फ्रेंडशिप डे साजरा करण्यात
आला यावेळी क्लबच्या महिलांनी महिला पोलीसांना मैत्रीबंध बांधून मैत्रीणी केल्या . प्रसंगी महिला पोलिसांनी या उपक्रमाचे स्वागत व कौतुक करीत समाधान व्यक्त करून एकमेकांना मैत्रीबंध बांधत मैत्री स्वीकारली .
दरम्यान तालुका पोलीस स्टेशन व बाजारपेठ पोलीस स्टेशनमधील कार्यरत महिला पोलीस अश्विनी जोगी ,मीना कोळी, सीमा चौधरी , समीना तडवी , प्रमिला गजरे यांचेही फुल गुच्छ देऊन स्वागत केले यांना मैत्रीबंध बांधण्यात आला तसेच भेटवस्तू देण्यात आली .
प्रसंगी बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड , गजानन पडघम, व सहकारी अधिकारी यांचेही क्लबच्यावतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले . प्रसंगी क्लबअध्यक्ष प्रियंका चौधरी सेक्रेटरी वैशाली सैतवाल, पत्रकार उज्वला बागुल प्रचना तांबोळी , मनीषा धांडे , रीना गायकवाड , पूजा बलके, विजया निकम वैशाली विसपुते यांचेसह महिला उपस्थित होत्या .

लीनेस क्लबतर्फे मुलींना सॅनिटरी पॅड वाटप :
भुसावळ –
९-८-२०२३ रोजी दुपारी 2:30 वाजता डी एल हिंदी स्कूल शिवाजीनगर येथे लीनेस क्लब तर्फे विजया निकम या २५० मुलींना सॅनिटरी पॅड वाटप करणार आहेत तसेच स्त्री रोगतज्ञ डॉक्टर वृषाली चौधरी यांचे समुपदेशन आयोजित केले आहे तरी सर्व महिलांनी सुद्धा याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे .