भुसावळ – येथील राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन तर्फे आज मंगळवार रोजी दुपारी १२:३० वाजता भुसावळ तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले
सदर निवेदनात मध्ये भडगाव तालुका मधिल गोंडगाव मध्ये राहणारी ८ वर्षीय अल्पवयीन बालिका हिला आरोपी नराधम स्वप्नील विनोद पाटील याने पिडित बालिकेला गुरांच्या गोठ्यात बोलावून तिच्यावर अत्याचार करुन तिने घरच्यांना सदर प्रकार सांगेल असे म्हटल्यावर यातील आरोपीने भितीपोटी तिची निर्घृण हत्या केली
सदर हत्येचा कोणाला संशय येऊ नये म्हणून गोठ्यात असलेल्या कडब्याच्या कुट्टीत लपवुन ठेवले हि अतिशय निंदनीय व क्रूर प्रकार असुन आम्ही महिला सदर घटनेचा निषेध करतो
दिवसेंदिवस वाढते अत्याचार बघायला मिळत असुन हि घटना ह्रदयाला धक्का देणारी घडली याकरिता शासनास अर्जाद्वारे विनंती आहे की सदर केस मध्ये कडक शासन झाले पाहिजे व कायद्याची भिती अशा नराधमांना व्हायला हवे जेणेकरून असा प्रकार कधी होऊन नये अशी मागणी निवेदनाद्वारे करून पिडित अल्पवयीन बालिकेच्या कुटुंबाला न्याय मिळावा याकरिता शासनाकडे मागणी केली ) सदर केस हि फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावी. सदर केस चालविण्या करिता सरकार तर्फे ॲड. उज्ज्वल निकम सरांची नियुक्ती करण्यात यावी केस मधील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आरोपी तर्फे वकिल बांधव व भगिनी यांना हात जोडुन नम्र विनंती कोणीही या केसमध्ये नराधमासाठी वकिल पत्र दाखल करु नये
या निवेदनाची दखल घेवुन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली .
यावेळी फाउंडेशन अध्यक्ष राजेश्री सुरवाडे सचिव निर्मला सुरवाडे,सहसचिव शैला तायडे,सुजाता सपकाळे ,समाजसेविका सुरेखा ठाकुर , पत्रकार उज्ज्वला बागुल, ॲड. प्रतिमा अग्रवाल,समाजसेविका चांद तडवी,समाजसेविका वंदना सोनवणे,छाया बाविस्कर,दिक्षा लोखंडे,छाया चौधरी,आशु लोखंडे, समाजसेविका वंदना सोनवणे, आम्रपाली किन्नर यांनी निवेदन दिले.



