भुसावळ – भुसावळात इमरान खान इदरीस खान महाराष्ट्र प्रदेश सचिव युवक कॉंग्रेस यांच्या वाढदिवसानिमित्त येथील खडका रोड परिसरातील मुस्लिम कॉलनी भागात वृक्षारोपण करण्यात येवून वाढदिवस साजरा करण्यात आला .
मागील दोन वर्षांत कोरोनाकाळात आपण अतिशय बिकट परिस्थितीचा अनुभव सर्वानी घेतला आहे यापार्श्वभूमीवर आपणही
निसर्गाचे देणे लागतो वृक्ष आपल्याला ऑक्सिजनच्या रुपात संजीवनी देत आहेत या वृक्षाचे आपण रक्षण करावे नवनवीन झाडे लावावी ही संकल्पना इम्रान खान यांना सखी श्रावणी महिला बहुदेशीय संस्था अध्यक्ष राजश्री नेवे यांनी सांगितली व त्यांनी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करणार तसेच परिसरात अन्य ठिकाणी सुद्धा वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणार असल्याची ग्वाही इम्रान यांनी यावेळी दिली .

भुसावळच्या सखी श्रावणी महीला बहुदेशीय संस्थे तर्फे ईम्रान खान यांना विविध वृक्षरोप भेट देण्यात येऊन सत्कार केला यावेळी इम्रान यांनी त्वरित वाढदिवसानिमित्त ही रोपे मुस्लिम कॉलनी परिसरात लावली व त्यांचे संवर्धनाची जबाबदारी स्वतः घेतली या निर्णयामुळे सर्वानी त्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या .
यावेळी संस्थेच्या सदस्या माया चौधरी,भाग्यश्री नेवे, पत्रकार उज्वला बागुल, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाचिटणीस संगीता भामरे यांचेसह महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश
उपाध्यक्ष मो मुनव्वर खान
अमीर खान , रहीम गवळी , खडका ग्राम पंचायत सदस्य, ,शेख तोफीक , भुसावळ विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस, शेख नुरू,सुरज सिंग,कमील खान,वसीम शहा,कामिल खान,इरफान खान, अन्वर मणियार,शेख शोएब,शेख इरफान,सय्यद शारुख,जुबेर शहा,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


