रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीतर्फे सफाई कर्मचारी बांधवांचा सहृदय सत्कार :

भुसावळ – आपण आरोग्यमय जीवन जगावे म्हणून आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या शहर व परिसरात अहोरात्र स्वच्छता करतात अश्या सत्कार येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीतर्फे भुसावळ शहरातील सफाई कामगार बांधवांचा सहृदय सत्कार करण्यात आला तसेच
विजय फिरके आर्यन मॅन यांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारार्थी यांना
रनर ग्रुपचे रंजीत खरारे ह्यांच्या सहकार्यने सर्टिफिकेट दिले गेले.
प्रसंगी अध्यक्ष नुतन हिरामण फालक, सचिव मनीषा पाटील, रो राजेंद्र बाविस्कर , रो हिरामण फालक, स्वप्नील बाविस्कर, आयर्न मॅन विजय फिरके, रंजीत खरारे यांचेसह सफाई कर्मचारी उपस्थित होते.