निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ भुसावळच्यावतीने दिपनगर येथे वृक्षारोपण :


भुसावळ –
जागतिक पर्यावरण दिनापासुन मंडळाने वृक्षरोपण मास घोषीत केला आहे म्हणुन प्रत्येक पर्यावरण मैत्रीण ही झाडे लावण्यास प्राध्यान्य देते
दीनांक 19/07/023 रोजी निसर्ग पर्यावरण गृपला दिपनगर एम एस सी बी ऑफीस विभाग मेजर स्टोअर इथुन विवेक पाटिल व मनोज अहीरे सरांनी वृक्षरोपणासाठी बोलविले होते तिथे त्यांनी स्वतःची खुप छान बाग केली आहे त्यात झाडे लावण्याची संधी मिळाली काही फुलझाडे व काही पारंपारीक झाडे अशी एकूण पंधरा झाडे लावली फुलझाडे 6- निशीगंध 2 कुंदकळी
1 सोनचाफा बदाम 1 औदबर1 ,जांबुळ, कडुलिंब, भोकर, चींच, करंज इ. झाडे लावली . आम्हाला मेजर स्टोअर डिपार्टमेंट स्त्री व पुरुष अभियंतां नी वृक्ष रोपणास मदत केली तसेच
आरती चौधरी यांच्या वृक्ष बॅंक मधील झाडे घेतली
कार्यक्रमाला स्वाती भोळे ,आरती चौधरी , विजया निकम संगीता पाटील, सारीका फालक , मंगला पाटील ,संगीता चौधरी , वर्षा सक्सेना मनिषा वसंता.आदी उपस्थित होत्या