भुसावळात महिला वकिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन व्याख्यान : स्री आरोग्य व हार्मोन्सचा खेळ” या विषयावर स्रीरोग तज्ञ डॉ.वृषाली चौधरी यांचे मार्गदर्शन :


भुसावळ – वकील संघात योग दिनाचे औचित्य साधून महिला वकील व न्यायालयीन महिला कर्मचाऱ्यांसाठी
“स्री आरोग्य…. हार्मोन्सचा खेळ” या विषयावर आय.वी.एफ सेंटरच्या प्रमुख स्रीरोग तज्ञ डॉ.वृषाली चौधरी यांचे मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सौ हेमा पाटील यांनी भूषविले प्रमुख वक्ते म्हणून डॉ. वृषाली चौधरी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून फौजदारी व दिवाणी न्यायाधीश क. स्तर सौ के. म . पत्रे, फौजदारी व दिवाणी न्यायाधीश क. स्तर श्रीमती एस. व्ही .जंगमस्वामी, फौजदारी व दिवाणी न्यायाधीश क. स्तर श्रीमती एस. व्हि. न्यायाधीश हे उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.वृषाली चौधरी यांनी पाळी जाण्यापूर्वी त्रासांचे लक्षणे, निदान व उपायोजना यावर प्रकाश टाकला 40 /45 च्या वयानंतर येणारा एमटी नेस्ट सिंड्रोमला कुटुंबाने साथ दिली तर कौटुंबिक मानसिक आरोग्य चांगले राहते टीनेजर्स मधल्या आहाराच्या चुकीच्या सवयी आणि बदलती जीवनशैलीमुळे पीसीओएस चे प्रमाण वाढत आहे त्यामुळे डिप्रेशन, चेहऱ्यावर मुरूम असे अनेक त्रास हार्मोन्स च्या बदलामुळे होतात म्हणून पोषक आहार घेतला पाहिजे गर्भपिशवीच्या कॅन्सरचे स्क्रीनिंग टेस्ट द्वारे निदान होऊ शकते तसेच बायोप्सी ,एच पी व्ही स्क्रीनिंग , लिपिड पी एस पी सारख्या चाचण्यांद्वारे हे निदान करता येते याची माहिती डॉ वृषाली यांनी विस्तृत दिली स्वतः ब्रेस्ट चाचणी कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले श्री शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुदृढ असणे हे अनेक समस्यां तयार होण्यापूर्वीचा इलाज आहे. विविध तपासण्या जसे आवश्यक आहेत तसेच निरोगी राहण्यासाठी व्यायाम,योगाही तितकाच महत्वाचा आहे असे त्यांनी यावेळी सांगितले
महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात बाहेर कामानिमित्त पडण्याची घाई गडबडीत जेवणाकडे लक्ष देत नाही त्यामुळे त्यांना उतार वयात अनेक आजार व समस्यांना सामोरे जावे लागते महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे व वेळोवेळी सर्व चाचण्या करून घ्याव्यात असे अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश हेमा पाटील यांनी सांगितले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. जास्वंदी भंडारी (पाटील) यांनी केले . वकील संघाकडुन नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात ज्यामुळे वकिलांना त्याचा लाभ होईल महिला वकील दिवसभर कामातच असतात त्यामुळे बाहेर जाऊन स्वतःच्या कधी आरोग्य तपासण्या करीत नाही स्वतःकडे दुर्लक्ष करतात असे होऊ नये म्हणून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असेही महिला प्रतिनिधी ॲड.जास्वंदी भंडारी(पाटील) यांनी प्रास्ताविकात सांगितले. तसेच पुढील सात दिवस डॉक्टर वृषाली चौधरी यांनी त्यांच्या सेंटरला सर्व महिला व महिला कर्मचारी यांची स्क्रीनिंग सोनोग्राफी टेस्ट मोफत उपलब्ध करून दिली आहे सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड नीता पाटील यांनी केले . आभार ॲड. चित्रा आचार्य यांनी मानले कार्यक्रमाला ॲड.संध्या शास्त्री,ॲड. कल्पना टेमानी,ॲड. शोभा पाटील, ॲड. मनीषा बाविस्कर, ॲड. कीर्ती सोनवणे, ॲड. मेघा वैष्णव,ॲड. स्वाती कापडे, ॲड. यामिनी कोळी, ॲड. वैशाली राठोड, ॲड. प्रियंका पाटील, ॲड. स्मिता पाटील, ॲड. अश्विनी ठोसर, इतर महिला वकील व महिला कर्मचारी उपस्थित होते.