भुसावळ – हिमाचल प्रदेश मध्ये सोलन येथे झालेल्या अखिल भारतीय नृत्य स्पर्धेत भुसावळ येथील नुपूर कथक डान्स अँकॅडमी चे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. नुपूर रमाकांत भालेराव हिला सेमी क्लासिकल मध्ये प्रथम क्रमांक व कथक नृत्यात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. युगल नृत्यात लहान गटात लतिका श्रीखंडे व किंजल बाऱ्हे यांना प्रथम तर रमाकांत व चारू भालेराव यांना मोठ्या गटात तृतीय क्रमांकाचे आणि किंजल बाऱ्हे हिस सेमी क्लासिकल मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. सर्व विजेत्यांना नृत्यशीक्षिका चारू भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले.हिमाचल प्रदेश चे आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच सामाजिक न्याय मंत्री कर्नल डॉक्टर धनिराम शांडिल्य यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या वेळी सोलन चे तहसीलदार व जिल्हाधिकारी उपस्थित होते. या वेळी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.येथील भाषा आणि संस्कृती विभाग यांच्या अद्ययावत नाट्यगृहात दिनांक सहा ते दहा जून २०२३ दरम्यान स्पर्धा संपन्न झाल्या. यात देशातील अनेक राज्यातील अनेक कलावंतांनी आपला सहभाग नोंदवला. या यशामुळे विजेत्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



