भुसावळ : शहरातील महिलेची 73 हजार रुपये किंमतीची दुचाकी बदलून देण्याच्या नावाखाली एकाने फसवणूक केल्याची घटना घडली. या प्रकरणी संशयिताविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जयमाला जितेंद्र तायडे (३९, पूजा कॉम्प्लेक्स, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी १६ जानेवारी २०२४ रोजी ७३ हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.१९ ई.सी.४१८०) ही संशयित दीपक राजपूत उर्फ दीपक धंजे (मलकापूर) यास दुचाकी बदलून देण्यासाठी दिली होती मात्र संशयिताने अद्यापही ही गाडी बदलून दिली नाही तसेच नेलेल्या गाडीची अन्य मार्गाने विल्हेवाट लावल्याचा संशय आहे. तपास सहाय्यक फौजदार सत्तार शेख करीत आहेत.


