भुसावळ – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे संस्थापक तथा ओबीसी नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाने रावेर लोकसभा मतदार संघातील दि. २८ आणि २९ दोन दिवस तालुका निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

रावेर लोकसभा मतदार संघातील तालुकानिहाय बैठकांमध्ये समता परिषदची तालुका कार्यकारणी तथा ओबीसी आरक्षण तसेच संघटना बांधणीवर चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी अखील भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अशोक नळे, जळगाव जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, कार्याध्यक्ष वसंत पाटील, अभीलाशा रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठका होणार असून ते मार्गदर्शन करणार आहे. तालुकानिहाय बैठकांना बारा बलुतेदार समाजातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षात काम करणारे ओबीसी बांधवानी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन महात्मा फुले समता परिषदचे भुसावळ तालुकाध्यक्ष संतोष माळी, महीला पदाधिकारी रेखा जाधव यांनी केले आहे.
तालुका निहाय बैठकी पुढीलप्रमाणे –
दि.२८ रविवार रोजी जामनेर सकाळी ९ वाजता, बोदवड दुपारी १२ वाजता, मुक्ताईनगर ४ वाजता, रावेर सायंकाळी ७ वाजता.
दि. २९ सोमवार रोजी यावल सकाळी ९ वाजता, चोपडा दुपारी १२ वाजता, भुसावळ सायंकाळी ५ वाजता माळी भवन येथे समारोप होणार आहे.


