भुसावळ : ईमारत बांधकामासाठी लोखंडी सळई वरच्या मजल्यावर नेत असताना वीज तारांना सळईचा स्पर्श झाल्याने मध्यप्रदेशातील युवक मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शहरातील वेडिमाता मंदिराजवळील विद्या नगरात शुक्रवारी घडली. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. (२१, रा.खंडवा, मध्यप्रदेश, ह.मु.सोमानी गार्डनजवळ, भुसावळ) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

भुसावळ शहरातील वेडीमाता मंदिराजवळील विद्या नगरात गेंदालाल देविदास चौधरी वास्तव्यास आहेत. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असून मध्यप्रदेशातील युवक मजूर सुशील आखाडे (२१) हा काम करीत होता.
शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास खालच्या घरातून लोखंडी आसारी वरच्या मजल्यावर नेत असताना लोखंडी आसारीला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने सुशीलला विजेचा जबर झटका बसला व त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. युवकाला भुसावळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अनिल चौधरी करीत आहे.


