श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस :


भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2023 साजरा करण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख अध्यक्षतेखालील प्रगती मैदान येथील सोहोळा सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मांचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी याची देही यांची डोळा ऑनलाइन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवला.
ततपश्चात महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमादरम्यान प्राचार्य डॉ आर बी बारजिभे यांनी सुसंस्कृत आणि बलशाली देश घडविण्याचे तरूणांसामोर मोठे आव्हान असल्याचे सांगितले. तसेच भावी अभियंत्यांनी तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापर व उपयोजितेतून सशक्त आणि बलशाली भारत घडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
‘पोखरण अणु चाचणी’ आणि भारताने बंगळूरच्या राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या हंसा 3 या पहिल्या स्वदेशी विमानाची यशस्वी चाचणी व या व्यतिरिक्त, भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) जमिमीवर हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी ही भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाचे व अभिमानास्पद टप्पे साजरे करतांना तंत्रविज्ञानाच्या प्रगतीचा अफाट वेग आणि भारतीय जीवनमूल्ये यांचा योग्य समतोल साधणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आय. क्यु. ए. सी. व इन्स्टिटयूशन इनोवेशन काऊंसिल समन्वयक डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.
‘स्कूल टू स्टार्टअप्स- इग्नाइटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट’ ह्या ब्रीदवाक्यानुसार नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी योगदानासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रकल्प समन्वयक म्हणून प्रा. अनिकेत पाठक यांनी सांगितले.
प्रकल्प समन्वयक म्हणून प्रा. अनिकेत पाठक यांनी तर सह- समन्वयक म्हणून प्रा. अनंत भिडे ह्यांनी जबाबदारी पार पाडली.

कार्यक्रमाला प्राचार्य डॉ आर बी बारजिभे, आय. क्यु. ए. सी. व इन्स्टिटयूशन इनोवेशन काऊंसिल समन्वयक डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा. ए. व्ही. पाटील, डॉ.एस. बी. ओझा, डॉ. पंकज भंगाळे, डॉ. अजित चौधरी, डॉ. डि. डि. पाटील, प्रा. डि. जी. अग्रवाल, प्रा. अनिकेत पाठक, प्रा. अनंत भिडे, डॉ. सौ. नीता नेमाडे, प्रा.सौ.सुलभा शिंदे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मांचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसन अग्रवाल,पंकज संड यांनी शुभेच्छा दिल्या.