राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन भुसावळ संचालित ” अवनी दत्तक योजना” शैक्षणिक उपक्रम अंतर्गत बहुजन समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप :

भुसावळ – राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन भुसावळ वतिने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची १९६ वी जयंती तसेच विश्वरत्न प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती निमित्त संयुक्त जयंती निमित्त शैक्षणिक उपक्रम अंतर्गत बहुजन समाजातील ज्यांचे आई वडील नाही असे व ज्यांचे आई वडिल हातमजुरी काम करतात अशा कुटुंबातील ५ वी ते १० मध्ये शिक्षण घेत असलेल्या गोरगरिब, होतकरु,गरजु २० विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य वितरण तसेच पोक्सो कायदा बद्दल मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम दि. 11 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कंडारी गाव ता.भुसावळ येथे दुपारी १२ वाजता घेण्यात आला.
प्रसंगी कार्यक्रम चे अध्यक्ष संजय सावकारे होते तर प्रमुख वक्ता म्हणून भारती रंधे म्हस्के महिला समुपदेशन केंद्र शहर पोलीस स्टेशन भुसावळ, प्रभारी सरपंच कंडारी निर्मला घोडेस्वार , संतोष निसाळकर ग्रा.प.सदस्य,सरजु तायडे ग्रा.प.सदस्य,मा.माजी.नगरसेवक राजेंन्द्र आवटे, दिपक तायडे ग्रा.प.सदस्य,सोनल झोपे ग्रा.प.सदस्य,नितिन पाटील ग्रा.प.सदस्य,गणेश माखुणे ग्रा.प.सदस्य,दगडू चौधरी ग्रा.प.सदस्य,प्रकाश मोरे ग्रा.प.सदस्य आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून द्वीप प्रज्वलित करण्यात आले नंतर उपस्थित मान्यवरांना फाउंडेशन तर्फे पेन भेट देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना फाउंडेशन अध्यक्ष राजेश्री सुरवाडे यांनी करतांना फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असलेल्या बद्दल माहिती दिली तसेच फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमी गरजवंताना मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्न करतो यासह संस्थेची थोडक्यात माहिती दिली . समाजातील दाते यांनी सढळ हाताने मदत करावी असेही आवाहन राजेश्री सुरवाड़े यांनी केले .
तर पोक्सो कायद्या विषयी भारती रंधे म्हस्के यांनी मार्गदर्शन केले दरम्यान The protection of children from sexsual offences Act. 2012 (पास्को कायदा) बाल लैगिंक अत्याचार विरोधी कायदा या विषयी माहिती सांगीतली लहान मुलांना स्पर्श , नको तो स्पर्श , लहान मुलांचा पाठलाग करणे, प्रोरनोग्राफी, अशिल व्हिडिओ दाखविणे प्रायव्हेट पार्टला टच करणे हा गुन्हाच आहे पोक्सो कायदा २०१२ संपूर्ण भारतात लागु आहे याविषयी माहिती दिली व पालकांनी मुलांना सोबत मैत्रीचे नाते जोपासुन त्यांना बाहेर गेल्यावर कोणी काही खाण्यासाठी दिले व बोलवले तर ते घेऊ नये व जाऊ नये सदर विषयी आपल्या पालकांना मुलांनी अशी घटना सांगितली पाहिजे अनोळखी व्यक्ती जर तुमच्या शरीरावर हात लावत असेल तर त्यास विरोध करून घरच्यांना सांगावे ब-याच घटनेत असे समोर आले कि बाल लैंगिक शोषणात लहान मुल व मुली यांचा समावेश आहे मुलांवर देखिल अत्याचार घडलेले आहेत या कायद्यात १८ वर्षा खालील मुलं,मुली,व तृतीयपंथी यांचा समावेश असुन यांच्या साठी हा कायदा लागु असुन अशा घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व अधिक कारावासाची तरतूद करण्यात आली आहे याविषयी मार्गदर्शन केले.माजी.नगरसेवक राजेंन्द्र आवटे यांनी फाउंडेशन तर्फे नेहमी गोरगरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मदत केली जाते हा उपक्रम खुप चांगला राबविण्यात येत असून असेच कार्य फाउंडेशनच्या माध्यमातून व्हावे आम्हीही आपणास नेहमी मदत करू असे बोलून मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे यांनी मनोगत व्यक्त करतांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मुळे आज भारतातील महिलांना शिक्षणाची संधी मिळाली महात्मा ज्योतीबा फुले यांनी माता सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन भारतात मुलींची पहिली शाळा सुरू करुन महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले असे महान कार्य फुले दाम्पत्यांनी केले व जगातील विद्वान व सर्वात हुशार विद्यार्थी कोन असेल तर प.पु डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत सर्वसामान्यांना समानतेचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वांना दिला आहे सर्व समाजात गरिब लोक असुन सदर उपक्रम सर्वांसाठी राबवावे व जयंतीनिमित्त फाउंडेशन च्या माध्यमातून अवनी दत्तक योजना अंतर्गत राबविण्यात येत असलेला हा शैक्षणिक उपक्रम खरोखर महापुरुषांच्या कार्याचा विचारांना व अभिप्रित असा समाजपयोगी उपक्रम असून अशीच जयंती साजरी व्हायला हवी जेणेकरून शिक्षणा पासुन कोणी वंचित राहणार नाही यापुढेही फाउंडेशनने असेच चांगले उपक्रम राबवावेत असे बोलून उपस्थितांना महात्मा ज्योतिबा फुले व प.पु डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. यानंतर अवनी दत्तक योजना शैक्षणिक उपक्रम अंतर्गत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते २० विद्यार्थ्यांनींना १ शाळेची बॅग, १२ वह्या २०० पेजस, १ कंपास साहित्यानी भरलेली, १ लेटरपॅड, ५ पेन, १२हातरूमाल , १ शिवाजी कोन होता? पुस्तक ई. शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले दरम्यान विद्यार्थीनींचे पालक , यांच्यासह प्रकाश सोनवणे,अमन घोडेस्वार, नरेंद्र यादव, राजेश चंदन , गावातील नागरिक यांचीही उपस्थिती होती .कार्यक्रमाच्या शेवटी सरजु तायडे कंडारी ग्रा.पं.सदस्य यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी फाउंडेशन चे सचिव – निर्मला सुरवाडे, सहसचिव- शैला तायडे, सुजाता सपकाळे, आनंद घोडेस्वार, राजेंन्द्र गणवीर, संतोष सोनवणे,गुलाब पिंजारी, उत्तम मोरे यांनी परिश्रम घेतले.