भुसावळ –
शुक्रवार दिनांक 5 मे रोजी जायंट्स ग्रुप ऑफ वसुंधरा व प्रेरणा सहेली गृपचा शपथविधी हॉटेल मल्हार मध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाला जायंन्टस गृपच्या अध्यक्षा ऍड संगीता पाटील व जॉइंट्स शहादा यांचे अध्यक्ष प्राचार्य एच. एम .पाटील तर जळगाव ओजस्विनी गृपच्या अध्यक्षा विभा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये
युनिट अध्यक्ष शपथविधी अधिकारी सौ महानंदा पाटील , नवनियुक्त वसुंधरा गृपच्या अध्यक्ष मंदाकिनी केदारे व नवनियुक्त प्रेरणा गृपच्या अध्यक्ष मीना राजपूत यांना जायंट्सची विचारधारा शपथ दिली.
तर जायन्ट्स अध्यक्ष संगीता पाटील यांनी वेगवेगळ्यापदांचे कार्य मीटिंग रिपोर्टिंग आंतरराष्ट्रीय मुख्यालय निर्धारित टारगेट फेडरेशन की संरचना ,युनिट कौन्सिलर कॉन्फरन्स, इंटरनॅशनल कन्वेषण ,विविध स्तरांचे अवार्ड रिपोर्टिंग , यासह सामाजिक कार्ययाविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य एच एम पाटील सर यांनी त्यांच्या मनोगतामधून सोशल वर्क कशा पद्धतीने करायचे त्याविषयी माहिती दिली . महिला कॉलेजचे सूर्यवंशी सर यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले .
मावळत्या अध्यक्षा राजश्री बादशहा व वर्षा लोखंडे यांनी त्यांच्या कामाचा आढावा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली वाघमारे यांनी केले तर आभार कविता महाले यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जायंट्स वसुंधरा व प्रेरणा गृ्पच्या सर्व सदस्यांनी मदत केली
वसुंधरा गृ्पच्या उपाध्यक्ष अंजली वाघमारे नीलिमा पाटील , सचिव आशा पाटील , कोषाध्यक्ष कविता महाले , तर प्रेरणा ग्रुपच्या उपाध्यक्ष सुरेखा तायडे जोस्ना कुलकर्णी सचिव मोनाली लोणारी कोषाध्यक्ष सारिका पाटील ,
ज्योती पवार ,अनिता ठाकरे , भाग्यश्री भंगाळे, शोभा जंगले, सुनीता इंगळे, सुष्मिता कोल्हेकर उषा मोरे, वंदना रत्नपारखी, सविता घाटे ,सविता वानखेडे, डॉ . छाया देशमुख रूपाली शैलेंद्र पाटील मनीषा पाटील प्रभा पाटील डॉ .वृषाली चौधरी निकिता खुशलानी, पुनम सुर्यवंशी मीना पाटील यांनी परिश्रम घेतले



