भुसावळ – भुसावळ शहरात दोन गावठी पिस्टल व दोन चॉपरसह तिन आरोपी जेरबंद करण्यात आले असून एकुण 1,33,000/- रु. किं. चा. मद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शहरात साकेगाव परिसरात एक इसम शाहरुख राजु पटेल रा. साकेगाव ता. भुसावळ
हा त्याचे कब्ज्यात गावठी कट्टा बाळगुन साकेगाव (ता. भुसावळ ) येथे फिरत आहे. अशी खात्रीशिर बातमी सोमनाथ वाघचौरे उप विभागीय पोलीस अधिकारी यांना मिळाल्याने
लागलीच त्यांनी त्यांचे पथकातील पो हे कॉ सुरज पाटील, पो हे कॉ रमण सुरळकर, पो ना
यासीन पिंजारी व पो ना संकेत झांबरे अश्यांना साकेगाव परिसरात रवाना केले. त्यानुसार सदर पथक हे
सुमारे दोन दिवसापासुन सदर आरोपींचे खडानखडा माहीती गोळा करुन त्यांच्या बारीक हालचालींवर लक्ष
ठेवुन होते. दिनांक 03/05/2023 रोजी रात्री सदर आरोपी शाहरुख राजु पटेल वय 25 रा. आंबेडकर नगर
साकेगाव ता. भुसावळ हा भुसावळ साकेगाव रोडवरील मराठी शाळेच्या ग्राउंडवर आला असल्याची या
पथकाला माहीती मिळाली त्यानुसार पथक हे त्याठिकाणी जावुन आरोपी शाहरुख पटेल यास काही
समजण्याचा आधी त्यास ताब्यात घेतले व त्याचे कडुन एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस तसेच दोन
चॉपर व मोटर सायकलसह ताब्यात घेतले. त्यास अधिक विचारपुस केली असता त्याने अजुन एक गावठी
पिस्टल त्याचेच गावातील त्याचा मित्र विकास पांडुरंग लोहार वय 30 रा. श्रिराम नगर साकेगाव ता.
भुसावळ याचेकडे सुद्धा आहे असे सांगीतले. त्यानुसार सदर पथकातील अंमलदार यांनी विकास लोहार यास
त्याचे राहते घरुन ताब्यात घेवुन त्याचेकडुन देखील एक गावठी पिस्टल हस्तगत केले. सदर कार्यवाही
दरम्यान वरील पथकाने त्यांना सविस्तर विचारपुस केली असता त्यांनी सदरचे दोन्ही गावठी पिस्टल या
आरोपी जयसींग उर्फ सोनु रायसींग पंडीत वय 26 रा. वाल्मीक नगर भुसावळ ता. भुसावळ याचेकडुन
प्रत्येकी 25,000/- रु. मधे खरेदी केले बाबत कबुल केल्याने लागलीच सदर पथकाने यातील आरोपी
‘जयसींग उर्फ सोनु रायसींग पंडीत वय 26 रा. वाल्मीक नगर भुसावळ ता. भुसावळ यास देखील लागलीच
वाल्मीक नगर भुसावळ येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडे देखील सविस्तर विचारपुस केली असता त्याने देखील
सदरचे दोन्ही गावठी कट्टे हे आरोपी शाहरुख राजु पटेल वय 25 रा. आंबेडकर नगर साकेगाव ता.
भुसावळ, विकास पांडुरंग लोहार वय 30 रा. श्रीराम नगर साकेगाव ता. भुसावळ अश्यांना प्रत्येकी 25,000/-
रु विक्री केल्याचे कबुल केले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक जळगाव एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक
चंद्रकांत गवळी तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ उप विभाग भुसावळ सोमनाथ वाघचौरे
यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ उप विभाग भुसावळ पथकातील पो हे कॉ
सुरज पाटील, पो हे कॉ रमण सुरळकर, पो ना यासीन पिंजारी व पो ना संकेत झांबरे अश्यांनी
केली असुन सदर आरोपीतांकडुन दोन गावठी पिस्टल, दोन चॉपर, एक जिवंत काडतुन, व एक बजाज पल्सर
कंपनीची मोटर सायकल असा एकुण 1,33,000/- रु. किं. चा. मद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी पो स्टे भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजी क्र. 83/2023 शस्त्र अधिनीयम
कलम 3/25, 5/25, 25(6)(7) (8) सह भा. द. वी. क 34 खाली गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्ह्याचा
पुढील तपास पो नि विलास शेंडे, स. पो. नि. अमोल पवार भुसावळ तालुका पो स्टे हे करत आहे.


