भुसावळ येथे नृत्य संस्कार उत्साहात संपन्न जागतिक नृत्य दिना निमित्त आयोजन. नुपूर अँकॅडमी चा उपक्रम


भुसावळ – येथील नुपूर कथक डान्स अँकॅडमी आणि ब्राह्मण संघ यांचे वतीने जागतिक नृत्य दिना निमित्त आयोजित नृत्य संस्कार हा शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन ब्राह्मण संघ चे सभागृहात करण्यात आले होते.शनिवार दि 29 रोजी सायंकाळी सात वाजता झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात डी. वाय. एस. पी. सोमनाथ वाघचौरे तसेच ब्राह्मण संघाचे अध्यक्ष विजय जोशी यांचे हस्ते नटराज पूजन आणि दीप प्रज्वलन करून झाली. या वेळी दिवंगत आप्तेष्टांना सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रास्ताविक करतांना नुपूर कथक डान्स अँकॅडमी चे संचालक रमाकांत भालेराव यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. यानंतर प्रत्यक्ष सादरीकरणात सुरुवात झाली. सुरुवातीला कींजल बाऱ्हे व लतिका श्रीखंडे यांनी ऋग्वेदातील दहाव्या मंडळातील शेवटचे सुक्त संगच्छध्व संवदद्धव या गीतावर नृत्य सादर केले. यानंतर अवनी धाडसे हिने सरस्वती वंदना सादर केली. या नंतर नीलम, किंजल बाऱ्हे,लतिका श्रीखंडे,सीमा पाठक यांनी अहिर भैरव व ताल त्रिताल मधील तराना सादर केला. नंतर हृदया सोनवणे,वृषाली लांडगे,मानवी नारखेडे,मनिशिका आरुषी,गार्गी पुसतकर,अक्षदा जाधव,मानवी पवार, लीशा महाजन यांनी रमस्तुती तर नीलम , कींजल बाऱ्हे,लतिका श्रीखंडे,सीमा पाठक यांनी जटा जुट ही शिवस्तूती सादर केले.नंतर नुपूर भालेराव हिने मुरली मनोहर कृष्ण कन्हैय्या या गाण्यावर नृत्य सादर करून रसिकांची दाद मिळवली. या नंतर हिमांशू जावळे याने धमार ताल व कृश्ण स्तुती कथक नृत्यातून सादर केली. नंतर नृत्याशिक्षिका चारू भालेराव यांनी दादरा तालतील बिंदादिन महाराजांची ठुमरी कथक नृत्यातून सादर केली.नंतर मानसी भवते हिने अधरंम मधुरं हे जयदेव रचीत कृष्णभजन सादर केले. या नंतर कींजल बाऱ्हे हिने मल्हार राहतील त्रिवट प्रकार सादर केला. लतिका श्रीखंडे हिने छम छम बाजे रे पायलिया या गाण्यावर तर किंजल बाऱ्हे हिने नाचे मन मोरा या गाण्यावर नृत्य सादर केले. सर्व सादरीकरणाला रसिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मान्यवरांनी आपले मत व्यक्त करतांना सहभागी कलावंत व नुपूर अँकॅडमी चे कौतुक केले. यावेळी सरिकांची प्रचंड उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार पंकज जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय बोचरे, वैभव कुलकर्णी,मेघा कुलकर्णी, मालती श्रीखंडे,सुरेखा पांडव यांनी परिश्रम घेतले.