जळगाव : जळगाव येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव या संस्थेला सुर्या फाऊंडेशन च्या वतीने देण्यात येणारा नोबल पुरस्कार २०२२-२३ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
सुर्या फाऊंडेशन यांच्या वतीने दि.३ फेब्रुवारी रोजी पाळधी येथील नोबल इंटरनॅशनल स्कूल आयोजित आविष्कार २०२३ वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात या नोबल पुरस्काराने नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेस सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला प्रसिद्ध सिनेअभिनेत्री माहेरची साडी फेम अलका कुबल यांची विशेष उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, जिल्हाधिकारी अमनजी मित्तल, महापौर जयश्रीताई महाजन, पोलीस उपअधीक्षक चंद्रकांतजी गवळी, शिक्षणाधिकारी विकासजी पाटील, उपशिक्षणाधिकारी विजयजी पवार, स्वामी समर्थ गृपचे अध्यक्ष मनोज अण्णा पाटील, कॅन्सर तज्ञ डॉ.निलेशजी चांडक, समाजसेविका महानंदाताई पाटील, उद्योगपती शरदचंद्र कासट, उद्योगपती गोपाल कासट, पारोळा येथील डॉ.हर्षलजी माने, उद्योगपती समाधान पाटील, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, पाळधी खु. सरपंच लक्ष्मीबाई कोळी,पाळधी बु.सरपंच अलकाताई पाटील, उद्योगपती दिलीप पाटील, दिव्य मराठी युनिट हेड संजीव पाटील सर, मा.पं.स.सभापती मुकुंद नन्नवरे, मनसे अध्यक्ष ॲड.जमिल देशपांडे, इ.उपस्थीत होते.
यावेळी नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव यांच्या सामाजिक, सांस्कृतिक व महिलांविषयक कार्याची दखल घेऊन त्यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते नोबल पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ.मनिषा पाटील यांच्यासह सचिव श्रीमती ज्योती राणे Adv सीमा जाधव, नूतन तास खेडकर, राधिका पाटील, श्रावणी पाटील, साईनाथ पाटील, आनंद पाटील, पंकज नाले, फिरोज शेख, किमया पाटील, रेणुका हिंगु, शशी शर्मा, संगीता चौधरी, माधुरी शिंपी, नेहा जगताप सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन व संकल्पना सुर्या फाऊंडेशन च्या संचालिका सौ.अर्चना सुर्यवंशी व श्री.प्रशांत सुर्यवंशी यांच्या वतीने करण्यात आले होते.



