मराठा महिला मंडळाचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न : कष्टकरी विधवा महिलांचा वाण देऊन सन्मान :

भुसावळ – मराठा महिला मंडळाचा हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाल्
समाजातील विधवा महिलांचा वाण देऊन सन्मान करण्यात आला
समाजातील विधवा महिला यांनी पतीच्या निधनानंतर खचून न जाता संसाराचा रथ काबाड कष्ट करून सांभाळला मुलांना शिक्षण दिले स्वतःच्या पायावर उभे केले अश्या कष्टकरी विधवा महिलांचा वाण देऊन सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ओवी वाघचौरे यांची होती त्यांनी महिलांना तीळ आणि गुळ एकत्र झाल्यानंतरच त्यात गोडवा येतो तसेच सर्व महिलांनी एकत्र राहुन गोडीगुलाबीने रहावे असे मत व्यक्त केले
समाजातील महिलांनी संघटित व्हावे एकमेकांना वाईट परिस्थितीत साथ देऊन आपल्या भगिनींना सक्षम कणखर बनविण्यासाठी प्रयत्न करून एक आदर्श समाजासाठी ठेवावा तसेच एकीचे बळ हे फार मोठे असते या तत्त्वाने जर राहिलो तर सर्व गोष्टी साध्य करता येईल असे मत जास्वंदी भंडारे (पाटील )यांनी व्यक्त केले
महिलांनी शारीरिक व मानसिक दृष्ट सुदृढ असावे यासाठी योगा ध्यान करावे म्हणजे प्रकृती चांगली राहील असे विचार महानंदा पाटील यांनी व्यक्त केले तसेच प्रीती चौधरी ,विद्या पाटील,ललीताताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले सन्मानर्थी महिला सुभद्राबाई श्रीधर सनांसे,आशा पाटील, उषा धनपाल ,मैनाबाई देशमुख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले एकमेकांना हळदीकुंक व वाण देवून कार्यक्रम संपन्न झाला .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छाया देशमुख, मोनाली ओगले , मनीषा भंडारे , भावना गवळी, वैशाली चौधरी, हर्षदा चौधरी , डॉ.छाया देशमुख,स्वाती पाटील, लता साळुंखे व मंडळ सदस्यांनी परिश्रम घेतले