वरणगांव –
हजरत कालुशाह वली आखाडा व हिंदु – मुस्लीम एकता समितीच्या वतीने दि.२९ रोजीी शहरात भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे . कुस्त्यांच्या या दंगलीसाठी राज्य व परराज्यातील पहेलवान तसेच महीला कुस्ती पटुंची उपस्थिती राहणार असुन त्यांच्या कुस्तींचा खेळ नागरीकांना पाहण्यास मिळणार आहे .
वरणगांव शहरात किमान चार वर्षाच्या कालावधी नंतर भव्य दिव्य अशा कुस्त्यांच्या दंगलीचे आज (दि.२९ ) हजरत कालुशाह वली आखाडा व हिंदू – मुस्लीम एकता समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे . या दंगलीसाठी राज्याचे मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन व आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून विशेष प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष सुनिल काळे, सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव अडसूळ, चंद्रकांत बढे यांचेसह इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे . शहरातील महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी ११ वाजेपासून कुस्तीच्या दंगलीला सुरुवात होणार असुन कुस्तीच्या दंगलीसाठी राज्य व परराज्यातील पहेलवान तसेच महिला कुस्ती पटुंचा खेळ नागरीकांना पाहण्यास मिळणार आहे . कुस्तीच्या दंगलीचे उत्तम पहेलवान, शकील पहेलवान, आवेश भांजा व इतर नामाकिंत पहेलवान पंच म्हणून काम पाहणार आहेत . यामुळे शहर व परिसरातील नागरिकांनी या कुस्तीच्या दंगलीचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक समितीने केले आहे .



