भुसावळ – येथील श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ब्लँका बोट्झ या संघाने राष्ट्रीय पातळीवर तंत्रज्ञान दृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेची म्हणून ओळखली जाणारी सी. ओ. ई. पी. अर्थात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अभिमत विद्यापीठ पुणे आयोजित राष्ट्रीय तंत्रज्ञान मेळावा माइंडस्पार्क 2023 मध्ये मानाचा कॉलेज करंडक जिंकून खान्देश परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. राष्ट्रीय पातळीवरील अकराहुन अधिक अग्रामानांकीत संघांचा सह्भाग असलेल्या ह्या रोबोटिक्स स्पर्धेत रोबो रेस, रोबो टास्क व रोबो वार ह्या महत्वपूर्ण स्पर्धा होत्या.
ह्या तिघंही रोबोटिक्स स्पर्धा गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या ब्लॅंका बोट्झ संघाने गाजवल्या. महाविद्यालयाच्या संघाने रोबो रेस मध्ये प्रथम क्रमांक तर रोबो टास्क स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक तर रोबो वार ह्या प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला.
पुस्तकी ज्ञानाबरोबरच उद्योगांना अपेक्षित उपयोजित ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि त्याच माध्यमातून काम करण्यासाठी महाविद्यालयात आम्ही मल्टी डिसीप्लिनरी सेल स्थापन केलेला आहे. पारंपरिक ज्ञांनाबरोबरीनेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स चिप तंत्रज्ञान अश्या भविष्यावेधी विषयांमधील पारंगत अभियंते घडविण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन ह्या प्रसंगी प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांनी केले.
उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे अवलोकन आणि त्यांचे उपयोजन साठी ह्या मल्टी डिसीप्लिनरी सेल द्वारे आम्ही प्रयत्न करत असतो आणि नव नवीन संरचना सादर करत असतो त्याच प्रयत्नातून साकारलेल्या रोबोट्सचा सी. ओ. ई. पी. च्या स्पर्धेतील विजय हा विशेष अभिमानास्पद असल्याचे ब्लँका बोट्झ समन्वयक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.
विजयी संघात गौरव योगेश महाजन, रोहित शरद चौधरी, शुभम झांबरे, अभय महिरे, निशांत भंगाळे यांचा समावेश होता.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसन अग्रवाल,पंकज संड तसेच सर्व विभागप्रमुख व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.



