भुसावळ – आर के शर्मा, मुख्य सुरक्षा आयुक्त, पश्चिम रेल्वे यांनी खंडवा स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 5 पासून खंडवा बायपास सनावदकडे जाणाऱ्या ट्रॅक, पुल आणि गेटची मोटार ट्रॉलीद्वारे पाहणी केली आणि जिथे त्रुटी होत्या त्या पूर्ण करण्याचा सल्ला दिला. खंडवा बायपास ते खंडवा स्टेशनपर्यंत गाड़ीची स्पीड ट्रायल घेण्यात आली.

या तपासणीदरम्यान मध्य आणि पश्चिम रेल्वेचे अधिकारी सहभागी झाले होते. पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी बांधकाम आर के यादव, मुख्य अभियंता बांधकाम मध्य रेल्वे श्री झा साहेब, भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री एस एस केडिया आणि रतलाम विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री रजनीश कुमार तसेच भुसावळ व रतलामचे शाखा अधिकारी उपस्थित होते.


