नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयात “माईंड पॉवर” या विषयावर कार्यशाळा उत्साहात संपन्न

भुसावळ – येथील नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयात नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात. त्या अंतर्गत आज दिनांक ९ रोजी
ऑल इंडिया माईंड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे यांच्याद्वारे पु. ओं. नाहाटा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी दोन सेशनमध्ये स्वतंत्ररित्या माईंड पॉवर या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.
ऑल इंडिया माईंड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे तर्फे आलेल्या श्रीनीवास मराठे यांनी त्यांचे सहकारी श्री. परदेशी यांच्यासोबत विविध प्रात्यक्षिकांसह आपल्या जीवनातील घटनांवर आपल्या पॉझिटिव्ह व निगेटिव्ह विचारांचा कसा प्रभाव पडतो, हे सोप्या शब्दात समजावून सांगितले. मनात निगेटिव्ह विचार कसे येतात व त्यांना बाजूला सारून पॉझिटिव्ह विचार करायची सवय मनाला कशी लावायची व या माध्यमातून यश कसे संपादन करायचे, हे त्यांनी सोप्या शब्दात उदाहरणाद्वारे दाखवून दिले. विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिक्षकांनीही प्रात्यक्षिकात सहभाग नोंदवून छान प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री. एस. व्ही. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य श्री. वाय. एम. पाटील सर, पर्यवेक्षिका श्रीमती एस. आर. तळले मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक श्री. एस. एम. दुसाने सर यांनी केले.