भुसावळ – राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशनतर्पेâ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ वी जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान प्रमुख पाहुणे पोनि गजानन पडघन, पोनि राहुल गायकवाड, पोनि विलास शेंडे, अॅड. सुनिल पगारे, मुख्याध्यापक मोहनदास सपकाळे, पत्रकारसंघाचे अध्यक्ष प्रेम परदेशी, अॅड. प्रिया अडकमोल आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व द्विप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी अॅड. प्रिया अडकमोल, पोलीस हवलदार आशा तडवी, महिला पोलीस नाईक स्मिता अहिरे, सिद्धार्थ ग्रृप भुसावळ, डॉ.संजय नेहते, डॉ.निलिमा नेहते, प्रा.डॉ.सुनील नेवे, विनीता नेवे, डॉ. दिपक पाटील, महिला समुपदेशन केंद्राच्या भारती म्हस्के-रंधे, भिम आर्मी भारत एकता मिशन जळगाव जिल्हा प्रमुख गणेश सपकाळे ,संदिप सपकाळे, राहुल बि-हाडे, कलीम खान, विजय सोनवणे, अल्केश मोरे, विशाल वाघमारे, शेख शकील, किशोर जोगदंड, सुरज टिंटोरे, महिला मुक्ती मोर्चाचे संगिता भामरे, वंदना सोनवणे, सोनु वाघमारे, आतिष वारभवन, श्वेतांग चंदेल, संध्या चंदेल, न्यु.पंजाब खालसा हॉटेलचे छोटु सारंग, माजी नगरसेवक पिंटु कोठारी, निरंजना तायडे, प्रकाश सोनवणे, मझर शेख, अजर शेख, मयुर अंजाळेकर, सेंट्रल बँक मॅनेजर नितीन शेंडे, मयुर सुरवाडे, बाळाभाऊ सोनवणे, शहराध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोचाचे राहुल तायडे, पत्रकार उज्वला बागुल आदींनी फाउंडेशनला अभिवादन स्वरूपात शैक्षणिक साहित्य देऊन मदतीचा हात दिला.
याप्रसंगी २० शाळेची बॅग,२० कंपार भरलेली,२०० पेज रजिस्टर -१००, १००पेज रजिस्टर ६३, पेन १२५, लेटरपॅड ६०,पेन्सील २४,रबर १०,ड्राईंग कलर बॉक्स छोटे, शिवाजी कोण होते? पुस्तक – २५, हातरूमाल १०७ पाकिट प्रत्येक एका पाकिटात १२ हातरूमाल आदी साहित्य संकलनात मिळाले. संकलीत साहित्य होतकरू, गरजवंत विद्यार्थीनींना फाउंडेशन संचालित अवनी दत्तक योजना या शैक्षणिक उपक्रमांतर्गत वितरण करण्यात येणार असल्याचे फाउंडेशनच्या अध्यक्षा राजेश्री सुरवाडे यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी फाउंडेशन सचिव निर्मला सुरवाडे, सहसचिव शैला तायडे, सुजाता सपकाळे, आशा पठारे, दुर्गा सोनवणे, प्रतिमा अग्रवाल यांनी परिश्रम घेतले.



